Gondia Accident News: भरधाव रुग्णवाहिका थेट किराणा दुकानात शिरली; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Ambulance Accident News: या घटनेत किराणा दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
Gonidia Accident News
Gonidia Accident NewsSaam TV
Published On

शुभम देशमुख


Gondia News: गोंदियातून काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली एक रुग्णवाहिका थेट एका किराणा दुकानात शिरली आहे. या घटनेत किराणा दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Gondia News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोंदियामधील गुदमा या गावात ही घटना घडली आहे. या गाावतील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शव घरी पोहचवण्यासाठी शववाहिका नसल्याने रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोहचवण्यात आला.

Gonidia Accident News
Nandurbar Crime News : चोरट्यांकडून १५ मोटरसायकलसह सहा मोबाईल जप्त; मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यात चोरी

मृतदेह घरी पोहतवून रुग्णवाहिका पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाली होती. यावेळी अचानक तिचा वेग वाढला आणि रुग्णवाहिका थेट एका किराणा दुकानात घुसली. रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

तसेच दुकानात देखील कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात दुकान मालकाचे नुकसान झाले आहे.

Gonidia Accident News
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटला; वाहतूक ठप्प

समृद्धी महामार्गावर कारचा धडकी भरवणारा अपघात

समृद्धी महामार्गावर देखील अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. नागपूरवरून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन महामार्गावरच उलटली. या भीषण अपघातात कारमधील ३ जण गंभीर जखमी झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com