Accident News: भरघाव टिप्परने दुचाकीस्वारांना उडवले; एकाच गावातील दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू

एकाच गावातील दोन तरुणांचा दुर्दवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Accident News
Accident NewsSaam tv

Ambevadi: मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रोडवरील अंबेवाडी फाट्याजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव टिप्पर आणि दुचाकीस्वारांमध्ये हा अपघात झाला असून भीषण अपघातात एक युवक जागीच ठार, तर दुसरा उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला आहे. घटनेनंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले. (Latest Marathi Update)

Accident News
Sushma Andhare: 'बॅनर पाहिला अन् १८ वर्षांनी हरवलेला भाऊ घरी परतला...' सुषमा अंधारेंची ह्रदयस्पर्शी पोस्ट होतेय व्हायरल

याबाबत अधिक माहिती अशी की, शेंदुर्जन ता. सिंदखेडराजा येथील तरुण अमोल शिवाजी खोडके (वय २६) व ओम गैभी खोडके (वय २४) हे आपल्या दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी अंबेवाडी फाट्याजवळून जात असताना भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.

या अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. तसेच, साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार काळे व कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातातअमोल हा जागीच ठार झाला होता. तर दुसर्‍या युवकास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.

Accident News
Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. मात्र नंतर तो साखरखेर्डा पोलिस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करित आहे या दुर्देवी घटनेने शेंदूरजन गावावर शोककळा पसरली आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com