Sushma Andhare: 'बॅनर पाहिला अन् १८ वर्षांनी हरवलेला भाऊ घरी परतला...' सुषमा अंधारेंची ह्रदयस्पर्शी पोस्ट होतेय व्हायरल

नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Sushma Andhare Viral Facebook Post
Sushma Andhare Viral Facebook PostSaamtv
Published On

Sushma Andhare Facebook Post: सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या शिंदे गटावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. राजकीय चर्चांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सुषमा अंधारे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सुषमा अंधारे यांच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ज्यामध्ये त्यांनी मी शिवसेनेला कुटूंब मानल आणि शिवसेनेनं माझ कुटूंब सावरल, असे म्हणत १८ वर्षांनंतर त्यांचा भाऊ घरी आल्याची माहिती या पोस्टमधून दिली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.. (Sushma Andhare)

Sushma Andhare Viral Facebook Post
Crime News: धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची गळा चिरुन हत्या, मृतदेह झोळीत नेतानाच...

सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी तब्बल १८ वर्षांनी त्यांचा घर सोडून गेलेला मावस भाऊ परत आल्याचे सांगत युवा सेना आणि सचिन अहिर यांचे आभार मानले आहेत.

त्यांची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sushma Andhare Viral Facebook Post
Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली विखे पाटलांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुषमा अंधारे यांची पोस्ट त्यांच्याच शब्दात... (Sushma Andhare Viral Post)

तुमच्या दृष्टीने सगळ्यात वाईट आणी जीवघेणं काय असेल..? मला वाटतं कुणीतरी येण्याची वाट बघणं... त्याच्या वाटेकडे डोळे लावून बघणं... काही तास.. दिवस.. आठवडे.. महिने नाही तर वर्षानुवर्ष वाट बघत राहणं.. अंतहीन.. अमर्याद.. अनिवार.. फक्त आणि फक्त त्या वाटेकडे डोळे लावून बसणं. माझ्या कुटुंबाने अशी तब्बल अशी अनिवार अंतिम आणि अमर्याद वाट पाहिली.. शक्य ते सगळे प्रयत्न केले. पण काल अचानक नियतीला हि आमचं हे वाट बघत राहणं बघून जणू पान्हा फुटला.

आमचं संयुक्त कुटुंब आहे कुटुंबात तब्बल 48 माणसं आहेत. तब्बल 18 वर्षांपूर्वी आमचा भाऊ घरातून कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला सुरुवातीला दोन-तीन दिवस तू कुठेतरी गेला असेल परत येईल असं वाटलं. अनेक ठिकाणी चौकशी केली. टीव्ही किंवा वर्तमानपत्रात हरवल्याची जाहिरात दिली तर त्याच्या जीवाला धोका होईल का अशी एक भाबडी भीती कुटुंबीयांना वाटत होती महिने उलटून गेले वर्ष उलटली पण तो काही परत आलाच नाही.

मध्ये दोन-तीन वेळा तो वेगवेगळ्या ठिकाणी असण्याची माहिती मिळाली कधी पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या मदतीने त्याला सासवडमध्ये शोधायला आम्ही गेलो, तर कधी वाघोली खराडी पुणे स्टेशन किंवा कधी राज्याच्या बाहेर, पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

Sushma Andhare Viral Facebook Post
Pune News : पुण्यात ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राला फोन करुन सगळी परिस्थिती सांगितली, पण...

परवा दिवशी गोरेगाव मध्ये शिव संवाद यात्रेची सभा झाली आणि बांद्रापासून गोरेगाव पर्यंत दूतर्फा सभेच्या निमित्ताने बॅनर्स झळकले. कसे कुठून त्याच्या नजरेला हे बॅनर्स पडले आणि ही बॅनर वर असणारी व्यक्ती माझी बहीण आहे हे त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार आणि विश्वास ठेवला तरी संपर्क कसा होणार?

कारण घरातला जुना लँडलाईन नंबर आता इतिहासजमा झालाय. फेसबुक आणि इतरत्र माझा संपर्क क्रमांक शोधायला सुरुवात झाली आणि मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला.

त्याने स्वतःहून काल फोन केला. बारामतीचा मेळावा आटोपून पाच वाजता मी परतताना त्याचा फोन धडकला. मी मुंबईत आहे असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो. पण नंतर मात्र फोन अचानक बंद झाला. वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या अशा वेळेला मदतीला कोण असेल ? आणि जेव्हा कधी मदत मागायची कोणाला असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर म्हणून एकच नाव पुढे असतं ते म्हणजे माननीय आमदार सचिन भाऊ आहिर.

भाऊंना फोन केला . ज्या नंबर वरून त्याचा फोन आला होता लोकेशन ट्रॅक केलं. माहीम कोळीवाडा किंवा बांद्रे परिसरामध्ये मदत हवी आहे म्हटलं आणि भाऊंनी तात्काळ युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितलं. युवासेना उपसचिव जय सरपोतदार अरुण कांबळे ही मंडळी तात्काळ आपल्या टीम सह येऊन दाखल झाले राहुल कनाल यांनीही फोनवरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणे सुरू ठेवला. (Facebook Post)

साडेनऊ वाजता सुरू झालेले शोध मोहीम रात्री दीड वाजता थांबली माहीम कोळीवाडा बांद्रे पश्चिम जामा मस्जिद लिंक रोड के सी मार्ग फायर कॅम्प अक्षयच्या इंदुरकर आणि काल रात्री दीड वाजता आम्हाला अठरा वर्षांपूर्वी आमच्यापासून दुरावलेला भाऊ मिळाला.

दरम्यान, या पोस्टच्या शेवटी सुषमा अंधारे यांनी सर्व युवा सैनिक आणि आमदार सचिन भाऊ अहिर यांचे माझे कुटूंबिय कायम ऋणी अशा शब्दात शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. त्यांची ही भावूक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com