Ambernath News : अंबरनाथ शहर हादरले; सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार

अंबरनाथ शहर दिवसाढवळ्या हादरले. दोन सख्ख्या भावांवर हल्ला करण्यात आला.
Ambernath News
Ambernath News SAAM TV

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये आज, शुक्रवारी खळबळजनक घटना घडली. सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. (Ambernath Crime News Update)

अंबरनाथमध्ये (Ambernath) दिवसाढवळ्या गोळीबार (Firing) करून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तुषार गुंजाळ असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Ambernath News
Pune : गटारीची पार्टी ठरली काळरात्र; किरकोळ वादातून तरुणाला संपवलं, १० जणांना अटक

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात शिवसेना शाखेसमोर आज दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. (Crime News) तुषार गुंजाळ आणि गणेश गुंजाळ या दोन सख्ख्या भावांवर हा हल्ला करण्यात आला. यापैकी तुषार याला गोळी लागल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला, तर गणेश याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यात तो जखमी झाला.

Ambernath News
Jalgaon: ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न; संशयित ताब्यात

एका कारमधून दोन ते तीन जण आले होते. त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तर हा प्रकार जुन्या व्यावसायिक वादातून घडल्याचा संशय पोलिसांना आहे. या हल्लेखोरांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com