Jalgaon: ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न; संशयित ताब्यात

‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न; संशयित ताब्यात
ATM Crime
ATM CrimeSaam tv

यावल (जळगाव) : दहिगाव येथील स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच चोरट्याने पलायन केले. दरम्यान, या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी (Police) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कृणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ हजर झाले. (Jalgaon News ATM Crime)

ATM Crime
Beed: गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन; रस्त्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक

दहिगाव (ता. यावल) येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकचे एटीएम (ATM) मशिन २७ जुलैच्‍या रात्री चोरट्याने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक (Bank) ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलिस पाटील संतोष पाटील व सरपंच अजय अडकमोल यांना कळविले. त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळविल्यानुसार पोलिस निरीक्षक व विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कृणाल सोनवणे यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यानुसार एका संशियतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

७० हजाराचे नुकसान

एटीएमच्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसून येत आहे. एटीएमचा पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तोडलेला आहे. एटीएममधील सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत. पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्गाची तपासणी केली. त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com