भ्रष्टाचाराची पोलखोल, अंगणवाडी सेविकेचं निलंबन, चोर सोडून संन्याशाला फाशी, 'साम'चा पोषण आहार रिअ‍ॅलिटी चेक

Bad Nutrition Food Exposed, Anganwadi Worker: भ्रष्टाचाराची पोलखोल करणं आता गुन्हा ठरू लागलयं... होय तुम्ही बरोबर ऐकताय... आंबेगावमधील अंगणवाडी सेविकेनं निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकल्यानं तिच्यावर निलंबनाची कारवाई झालीय...मात्र चोर सोडून संन्याशाला हा फाशी करण्याचा प्रकार कसा घडला... पाहूयात या रिपोर्टमधून...
ANGANWADI WORKER SUSPENDED AFTER EXPOSING POOR QUALITY NUTRITION FOOD IN AMBEGAON
ANGANWADI WORKER SUSPENDED AFTER EXPOSING POOR QUALITY NUTRITION FOOD IN AMBEGAONsaam tv
Published On

महाराष्ट्रातील अंगणवाडी असो वा जिल्हा परिषद शाळा, लहान मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय....आंबेगाव तालुक्यातल्या अंगणवाडीत निकृष्ट आहार दिला जात असल्याचा पर्दाफाश करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच आता निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी न शिजणाऱ्या वाटण्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून प्रशासनाला जाब विचारला होता. मात्र दोषींवर कारवाई करण्याऐवजी देवयानी यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे देवयानी यांनी निराशेपोटी थेट आत्महत्येचाच इशारा दिला.

मात्र चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा अजब प्रकार महिला आणि बाल विकास खात्यानं केल्यानं खासदार अमोल केल्हेंनी चांगलाच संताप व्यक्त केलाय... दरम्यान अंगणवाडी सेविकेनं रिल काढण्याऐवजी लेखी तक्रार द्यायला हवी होती, असं म्हणत गटविकास अधिकाऱ्यानं कारवाईचं समर्थन केलयं... मात्र साम टीव्हीनं दुसऱ्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन याचा रियालिटी चेक केला आणि तिथल्या अंगणवाडी सेविकांशीही अन्नाच्या दर्जाबाबत संवाद साधला असता काय सत्य समोर आलं ते पाहूयात....

ऐकलंत...या अंगणवाडी सेविकेनंही सांगितलंय की महिनाभरापूर्वीच अधिकाऱ्यांकडे निकृष्ट अन्नाबाबत तक्रार केली होती. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारीच्या नावानं जो गळा काढलाय तो किती तकलादू आहे ते सिद्ध होतं. मुळात देवयानी यांनी यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला सुरूंग लावला म्हणूनच त्यांच्यावर कारवाई केली. कारण अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून अंगणवाड्या भ्रष्टाचाराचं कुरण बनल्या आहेत. मात्र यांची टक्केवारी गरिबांच्या मुलांच्या जीवावर उठायला नको एवढीच माफक अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com