Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला

Akola Crime News : अकोल्यात विधवा महिलेवरील गंभीर अत्याचार प्रकरणात आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला
Akola Love Jihad Case News Saam Tv
Published On
Summary
  • अकोल्यात महिला अत्याचार प्रकरण उघड

  • आरोपीवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

  • न्यायालयाने जामीन फेटाळला

  • आरोपी पोलीस कोठडीत, तपास सुरू

  • महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

अक्षय गवळी, अकोला

Akola Love Jihad Case News अकोल्यात विधवा हिंदु महिलेच्या पायात घुंगरू बांधून, तिला नाचवून जबरदस्ती बीफ खायला देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर सध्या न्यायालयात केस सुरु आहे. या आरोपीचे नाव सरदार खान असे आहे. आरोपी सरदाराने जामिनासाठी अर्ज दाखल केला असून न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २००१ ला लग्न झाले होते परंतु २०१५ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर पीडिता लहान मुलांसह दहीगांव अवताडे येथे वास्तव्यास होती. तिथे राहत असताना त्यांच्या घराजवळ असणारा सरदार खान सत्तार खान याच्यासोबत तिची ओळख झाली. काही दिवसांनी त्या दोघांमधे प्रेमसंबध निर्माण झाले. आरोपीने फिर्यादीला सांगितले की, तो त्याच्या पत्नीला तलाक देणार आहे आणि फिर्यादीसोबत लग्न करणार आहे. आरोपीने महिलेला लग्नाचे वचन देऊन शारीरीक संबध ठेवले परंतु लग्न करण्यास नकार दिला.

Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला
Shocking : हृदयद्रावक! आईच्या साडीचा झोपाळा केला, खेळता खेळता गळ्यात अडकला; ८ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू

महिलेने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. महिलेच्या आईने आरोपीला जाब विचारला असता त्याने लग्नाला नकार देऊन त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर बदनामीच्या दडपणाखाली पीडित महिला दहिगाव सोडून नाशिक येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर २०२५ ला आरोपीने फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच लग्नासाठी मागणी देखील घातली, यावेळेस मात्र पीडितेने त्याची मागणी धुडकावून लावली. याचा राग मनात धरून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल केले आणि धमकावले.

Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला
Nida Khan : नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणातील HR निदा खान निघाली टेलीकॉलर

आरोपीच्या धमक्यांना घाबरून भेटायला गेली आणि लग्न करतो सांगून आरोपीने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. नराधम आरोपीने याचे व्हिडिओ आणि फोटो देखील काढले. यादरम्यान त्याने महिलेला बीफ खाऊ घातले. महिलेने नकार दिल्यास तो तिला मारहाण करत असल्याचे उघड झाले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या मित्राला देखील पिडीतेसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे न केल्यास तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच आरोपी हा पिडीतेला गोमास, खायला लावत होता व पिडीतेच्या पायामध्ये घुंगरु बांधुन तिला नाचायला लावायचा असा आरोप महिलेने केला आहे.

Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला
Nida Khan : 'माझी मुलगी गरोदर... '; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणातील HR निदा खानच्या आईचा मोठा खुलासा

या प्रकरणी सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून आज न्यालयात त्याने जामीन पत्र दाखल केले. मात्र हा जामीन न्यायालयाने फेटाळला असून जामीन दिल्यास आरोपीपासुन पिडीता व पिडीतेच्या कुटुंबाच्या जीवीतास धोका निर्माण होवू शकतो. सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर सुरु असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भटकर हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com