10 हजार देतो, तुझ्या मुलीला पाठव… लॉकअपमधील आरोपी महिलेकडे पोलीसाची घाणेरडी मागणी; ASI थेट तुरुंगात

Akola Police ASI Sexual Demand Case Full Details: अकोल्यातील पोलीस कोठडीत महिला कैद्याकडून अश्लील मागणी केल्याप्रकरणी ASI राजेश जाधव याला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली.
Akola police officer arrested after alleged obscene demand from a woman in custody sparks outrage.
Akola police officer arrested after alleged obscene demand from a woman in custody sparks outrage.Saam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला येथे पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ASI पोलीस अधिकारी राजेश जाधवची न्यायालयाने कारागृहात रवानगी केलीय. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच ASI राजेश जाधव याने अटकेतील महिलेकडं शरीर सुखाची मागणी केली होती. जाधव याने अटकेतील महिलेला तुझ्या मुलीच वय किती? 10 हजार रुपये देतोय रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होता.

Akola police officer arrested after alleged obscene demand from a woman in custody sparks outrage.
Security Breach in Lok Sabha | लोकसभेतील खासदारांकडून घुसलेल्या तरुणाला चोप

या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. याचा एक व्हिडिओ देखील वायरल झाला होता. यामध्ये वरिष्ठांनी या 'एएसआय'च्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला होता. जाधव विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस खात्यातून त्याचे निलंबन करण्यात आल होत. दरम्यान, आज जाधवची तुरुंगात रवानगी केली असून थोड्या वेळातच अटकेतील महिलासमोर जाधव याची ओळखपरेड होणार आहे, तहसीलदारांच्या उपस्थित कारागृहात ही ओळखपरेड होणार असून न्यायालयाने याची परवानगी दिली आहे.

Akola police officer arrested after alleged obscene demand from a woman in custody sparks outrage.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

नेमके प्रकरण काय?

अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये काल सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 80 लाखांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेला एका पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. यावेळी तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राजेश जाधव याने तिच्या मुलीच्या चौकशी केली. यानंतर त्याने तुझ्या मुलीला 10 हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव अशी अश्लील मागणी केल्याचा आरोप महिलेने केला.

Akola police officer arrested after alleged obscene demand from a woman in custody sparks outrage.
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट? पटेल अन् तटकरेंवर पक्षाच्या सुप्रिमो नाराज; वादाचा घटनाक्रम आला समोर

सदर घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय अनिल जुमळे लगेचच घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेने टाहो फोडत घडलेला सर्व प्रकार जुमळे यांना सांगितला. यावेळी संतापलेल्या जुमळे यांनी संबंधित ASI राजेश जाधव याला जाब विचारला. त्यानंतर संतापात त्याच्या कानशिलात मारण्यासाठी हात ही उगारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com