

हर्षदा सोनुने, प्रतिनिधी
अकोल्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक झाली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांची भेट घेवून ते अमरावतीकडे निघाले होते.
यावेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विजयराज शिंदे यांच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवेंद्र फडणवीस अकोल्यात..
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे महाआरोग्य शिबिरासाठी अकोल्यात (Akola) दाखल झाले आहेत. नांदेड रुग्णालयातील मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनाही स्थानबद्ध केले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.