हर्षदा सोनोने
विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सुरू असलेल्या संप अजूनही सुरू आहे. (Akola) मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. (Live Marathi News)
शासनाने या पूर्वी ग्रॅज्युइटी आणि पेन्शनच्या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिल होतं. मात्र या संदर्भात अजून कोणताही जीआर न काढल्याने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आलं आहे. तर धरणे आंदोलनामुळे शिक्षण व आरोग्य सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. मानधनवाढ, पेन्शन आणि इतर मागण्याबद्दल कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे (Anganwadi Workers) अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी नाराजी व्यक्त करत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दीड हजार रुपयांची मानधनवाढ एप्रिलपासून दिल्यामुळे आता पुन्हा वाढ देता येणार नाही असे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी नाराजी व्यक्त करत धरणे आंदोलन सुरू केले आहे. दीड हजार रुपयांची मानधनवाढ एप्रिलपासून दिल्यामुळे आता पुन्हा वाढ देता येणार नाही असे कारण देण्यात आले आहे. मात्र ही वाढ अतिशय अपुरी असून आशासेविकां इतकी मानधनवाढ मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.