Akola News : विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक; घटनेच्या निषेधार्थ अकोट शहर बंद, ६५ जणांना अटक

Akola News : गणपती विसर्जन मिरवणुकीत अकोट शहरातील नंदीपेठ भागात गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ही मोठी दगडफेक झाली होती. दगडफेकीनंतर काही काळ मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला होता
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली होती. या प्रकरणी ६५ जणांना पोलिसांनी अटक केली असून घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पडला आहे. 

गणपती विसर्जन मिरवणुकीत अकोट (Akot) शहरातील नंदीपेठ भागात गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ही मोठी दगडफेक झाली होती. दगडफेकीनंतर काही काळ मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला होता. दगडफेकीमुळे मिरवणूक काही काळ थांबलेली होती. मात्र, त्यानंतर मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान आज अकोट शहरात (Police) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहेय. या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरातल्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला आहे. सद्यस्थितीत आकोट शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

Akola News
Thane Water Supply : ठाण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा बंद; पाईप लाईन दुरुस्तीचे काम असल्याने एक दिवस उशिराने पाणी

दरम्यान अकोला (Akola News) पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची ओळखपरेड सुरू करत ६५ जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान दगडफेक करणाऱ्या अटकेतील ६५ जणांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, दगडफेक प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी अकोट शहरवासियांनी केली आहेय. शेकडो नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठत निवेदन दिले आहे. तर ईद मिलादुन्नबीची शोभायात्रा अकोटमधल्या मुस्लिम बांधवांनी आज रद्द केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com