महापालिकेत तुफान राडा; शिवसेना-भाजप नगरसेवक एकमेकांवर धावले, परिसरात बंदोबस्त वाढवला|VIDEO

Akola Municipal Corporation: अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत जोरदार वाद झाला. विकासकामांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
Heated clash between BJP and Shiv Sena leaders inside Akola Municipal Corporation triggers chaos and police intervention.
Heated clash between BJP and Shiv Sena leaders inside Akola Municipal Corporation triggers chaos and police intervention.saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला महानगरपालिकेत आज सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. विकासकामांच्या दर्जावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटांचे नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यात विकासकामांच्या निकृष्ट दर्जावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर लवकरच मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही लोकप्रतिनिधी एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेले. या गोंधळानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना तातडीने निलंबित करण्याचे आणि त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर वातावरण अधिकच तापले. विजय अग्रवाल यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप सागर भारुका यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

Heated clash between BJP and Shiv Sena leaders inside Akola Municipal Corporation triggers chaos and police intervention.
LPG Shortage: सरकारचा मोठा निर्णय, आता प्रत्येक कुटुंबाला मिळणार ३ लिटर रॉकेल

दोन्ही नेत्यांमधील हाणामारीची शक्यता लक्षात घेता, भाजपचे गटनेते पवन महले आणि उपस्थित पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेनंतर महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Heated clash between BJP and Shiv Sena leaders inside Akola Municipal Corporation triggers chaos and police intervention.
CBSE Result 2026: दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता

यानंतर सागर भारूप यांनी संवाद साधत भाजपच्या सभापतीवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजपचे सभापती विजय अग्रवाल यांनी मला शिवीगाळ केली. त्यांना मी शिवीनेच प्रतिउत्तर दिले. हे लोक अकोला महापालिका विकायला निघाले असून याला मी ठामपणे विरोध दर्शवला. तसेच हा सभापती सदनमध्ये अत्यंत खालच्या भाषेत बोलत असतो. याचे जुने दिवस मला आज आठवत आहे. हा कुठला दादा नसून एका अड्ड्यावरचा हा किरकोळ दादा होता. यांना माता भगिनीसोबत बोलायची पद्धत नाहीये. हा सागर भारुका नेहमीची आवाज उठवत राहील असा इशारा ही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com