

२९ पैकी पहिल्या महापालिकेचा महापौर ठरला
अकोल्यात भाजपचा महापौर
शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड
अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणुका होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकेसाठी महापौर निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, आता राज्यात पहिल्याच महापालिकेसाठी महापौराची निवड झाली आहे. अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे.
शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव केला होता भाजपच्या शारदा खेडकर यांचा ४५ मतांनी विजय झाला होता.
अकोल्यात भाजपचा महापौर (Akola Mayor Announced)
भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी दिला भाजपला पाठिंबा दिला.
दरम्यान, एमआयएमचे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले. महापालिकेत काँग्रेसने आधी दावा केला होता परंतु तो फोल ठरला. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. २९ पैकी पहिल्याच महापालिकेचा महापौर ठरला आहे. अजून इतर महापालिकेच्या महापौराबाबत निर्णय बाकी आहेत. लवकरच इतर महापालिकेचीह महापौर ठरतील, असं सांगितलं जात आहे.
उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे
अकोला महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे अमोल गोगे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या आजाद खान यांचा 45 मतांनी विजय केला होता. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही एमआयएमची तटस्थ भूमिका होती. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
अकोला महापालिकेत कोणत्या गटाचे किती उमेदवार विजयी?
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.