KDMC News : ठाकरेंचे ते ४ नगरसेवक गेले कुठे? निवडणूक निकालानंतरही बेपत्ता, सस्पेन्स वाढला

thackeray sena councillors missing after kdmc election :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरेसेनेचे ४ नवनिर्वाचित नगरसेवक अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
kdmc election suspense as four thackeray sena councillors go missing
kdmc election suspense as four thackeray sena councillors go missingsaam tv
Published On
  • शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक अजूनही बेपत्ता

  • कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ

  • बेपत्ता नगरसेविकेच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस

  • सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेत आलेला ट्विस्ट कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर नगरसेविका स्वप्नाली केणे यांच्या निवासस्थानाबाहेर कारणे दाखवा नोटीसचा फलक लावण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून स्वप्नाली केणे, कीर्ती ढोणे, मदुर म्हात्रे, राहुल कोट हे ठाकरे सेनेच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक 'गायब' आहेत. यातील मदुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे सेनेकडून आधीच नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आता स्वप्नाली केणे यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) गटनेते उमेश बोरगांवकर यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. बैठकीला अनुपस्थित राहण्यामागची कारणं २४ तासांत लेखी स्वरूपात स्पष्ट केली नाहीत तर संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

kdmc election suspense as four thackeray sena councillors go missing
KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत मनसेने महापौरपद गमावलं, भाजपसोबत गेले असते तर मिळाली असती संधी

पक्षशिस्त आणि संघटनात्मक निर्णयांचे पालन करणे प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी बंधनकारक असल्याचे बोरगांवकर यांनी नमूद केले. महापालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. अशा वेळी अनुपस्थित राहणे आणि संपर्काबाहेर राहणे हे गंभीर आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, चारही नगरसेवकांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम आहे. या कारवाईमुळे ठाकरे सेनेतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. पुढील २४ तासांत संबंधित नगरसेवक खुलासा करतात की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

kdmc election suspense as four thackeray sena councillors go missing
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com