Akola News : शाळा उघडताच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; खिचडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

Akola School Crime News : शाळा उघडताच शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना अकोला शहरातील एका जि. परिषद शाळेत घडली.
Akola School Crime News
Akola School Crime NewsSaam TV

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका ५२ वर्षीय कर्मचाऱ्याने शाळेतील ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना अकोल शहरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली. याप्रकरणी अकोला पोलिसांनी आरोपीविरोधात बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Akola School Crime News
Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

चंद्रमणी (वय ५२) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रमणी हा शहरातील (Akola Latest News) एका प्राथामिक शाळेत पोषण आहार बनवण्याचे काम करतो. शाळा उघडल्यानंतर ४ जुलै रोजी आरोपीने पीडित विद्यार्थिनीला खिचडी देण्याचं अमिष दाखलवून एका खोलीत नेलं.

तिथे तिच्यावर अतिप्रसंग (Crime News) करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. ती सलग दोन-तीन दिवस शाळेतच गेली नाही. मुलगी शाळेत जात नसल्याने आईने तिला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला.

मुलीने सांगितलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने शाळेत धाव घेऊन याबाबत मुख्याद्यापकांना जाब विचारला. प्रकरण शाळेत पोहचल्याचं कळताच आरोपी चंद्रमणी याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Akola School Crime News
Wardha ST Bus Accident : कारंजा राष्ट्रीय महामार्ग भरधाव एसटी बसने तब्बल ११ शेळ्यांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com