Akola By-poll: अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं

Shivsena Thackeray Group And Congress: अकोल्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठं यश मिळाले आहे. पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय झाला.
Akola By-poll:  अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं
Akola By-pollSaam Tv
Published On
  • अकोल्याच्या पातूर नगरपालिकेत काँग्रेस-ठाकरेसेना आघाडीचा विजय

  • इद्दू पैलवान नगराध्यक्षपदी विजयी झाले

  • भाजपला पातूरमध्ये मर्यादित यश मिळाले पण अकोटमध्ये दुहेरी विजय

  • अकोला जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिका निवडणुकीसाठी काल उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. पातूरातील 20 सदस्य आणि नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी हे मतदान झालं. येथे सदस्य पदाच्या 20 जागांसाठी 75 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पातूर या ठिकाणी 73.33 टक्के इतकं मतदान झालं होतं. या निवडणुकीत विविध पक्ष आणि आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. पातूर नगरपालिकेत महायुतीतील भाजप आणि शिंदे यांची शिवसेना स्वबळावर लढली. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेत एकत्र लढली.

महाविकास आघाडीच्या वतीने येथे काँग्रेसचे हिदायत खान रूम खान उर्फ इद्दू पैलवान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक आघाडीची स्थापना करत त्यात वंचित आणि एमआयएमला सामावून घेतले होते. या आघाडीकडून माजी नगराध्यक्ष सय्यद बुरहान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. तर भाजपने येथे नगराध्यक्षपदासाठी सचिन ढोणे यांना रिंगणात उतरवलं होतं. तर शिंदेंच्या शिवसेनेने सुभाष कोचरे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिली होती. मात्र इथे प्रमुख लढत ही काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, वंचित आणि एमआयएम यांच्या एकत्रित 'विकास योद्धा पॅनल'मध्येच होती.

Akola By-poll:  अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं
Poilitical Crisis News : पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व आहे. पातूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हिदायत खान रूम खान उर्फ इद्दू पैलवान विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास योद्धा पॅनलचे सय्यद बुऱ्हाण नबी यांचा 1601 मतांनी पराभव केला. इद्दू पैलवान यांना 6009 मते मिळाली. तर राष्ट्रवादी, वंचित आणि एमआयएम आघाडीचे बुऱ्हान नबी यांना 4408 मते मिळाली. भाजपचे सचिन ढोणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर शिंदेसेनेच्या सुभाष बोचरे यांना फक्त 194 मते मिळाली.

Akola By-poll:  अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं
Maharashtra Politics: ठाकरेंच्या विश्वासू खासदारांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? धक्कादायक कारण आलं समोर

अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय झाला. नगरसेवकांच्या 2 पोटनिवडणूक जागांवर भाजपने विजयी मिळवला. भाजपचे उमेश हरसुलकर यांनी 1401 मते मिळवत शिंदेशिवसेनेच्या रेश्मा चंदन यांचा पराभव केला. भाजपच्या शारदा योगेश नाठे यांनी देखील 1706 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भारती प्रशांत नाठे यांचा 778 मतांनी पराभव केला. दरम्यान, आता अकोट नगरपालिकामध्ये भाजपच्या पक्षीय बलाबल संकेत 2 जागांहून वाढ झालीय. आता 11 जागांहून थेट 13 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी असणार आहे.

Akola By-poll:  अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

पातूर नगरपालिकेतील पक्षीय बलाबल:

एकूण जागा : 20

- काँग्रेस 08

- शिवसेना उबाठा : 02

- भाजप : 02

- विकास योद्धा आघाडी ( राष्ट्रवादी अजित पवार- वंचित- एमआयएम) : 08

Akola By-poll:  अकोल्यामध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेस-ठाकरेसेनेचा विजय, कुठे कुणी मारली बाजी? वाचा विजय उमेदवारांची नावं
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार अडचणीत येणार; उद्धव ठाकरे टाकणार अखेरचा डाव, काय आहे प्लॅन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com