Akola : रेल्वेत तरुणीची छेड काढणं पडलं भारी! रोड रोमिओच्या हातात बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन्...

Akola Crime News : अकोल्यातील भुसावळ-वर्धा पॅसेंजर रेल्वेत एका तरुणाने तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला. महिलांनी धाडस दाखवत संबंधित तरुणाला गांधीगिरी स्टाईलने शिक्षा दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
AKOLA TRAIN HARASSMENT CASE: WOMEN TEACH HARASSER A LESSON IN GANDHIGIRI STYLE, VIRAL VIDEO SPARKS DEBATE
AKOLA TRAIN HARASSMENT CASE: WOMEN TEACH HARASSER A LESSON IN GANDHIGIRI STYLE, VIRAL VIDEO SPARKS DEBATESaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील भुसावळ-वर्धा पॅसेंजर रेल्वेत तरुणीची छेडछाड

  • तरुणीने धाडस दाखवत संबंधित तरुणाला सर्वांसमोर जाब विचारला

  • प्रवाशांनी तरुणाला पकडून गांधीगिरी स्टाईलने बांगड्या आणि लिपस्टिक लावून शिक्षा दिली

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अक्षय गवळी, अकोला

राज्यात छेडछेड, बलात्कारासारख्या अनेक घटना घडताना आपण पाहत आणि ऐकत आलो आहोत. अलीकडेच नागपूरचं एक कुटुंब वाराणसीहून देवदर्शनकरून नागपूरला येताना रेल्वेच्या कोचमध्ये महिलांचा विनयभंग झाला आणि एकच खळबळ उडाली. अशातच आता अकोल्यात देखील अशीच घटना घडली आहे. एका पॅसेंजर रेल्वेत तरुणाने महिलांची छेड काढली. मात्र या महिलांनी घाबरून न जाता धाडसीपणाने परिस्थितीला सामोरे जात गांधीगिरी स्टाईलने शिक्षा केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांच्या या धाडसाने 'एक नारी सब पे भारी' या वाक्याचा प्रत्यय आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगावहून बडनेराकडे जाणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा पॅसेंजर मेमो’ रेल्वेत ही घटना घडली. रेल्वे प्रवासादरम्यान एका तरुणाने डब्यातील तरुणीशी अश्लील वर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र संबंधित तरुणाची वागणूक सुरूच राहिल्याने तिने त्याला जाब विचारला.

AKOLA TRAIN HARASSMENT CASE: WOMEN TEACH HARASSER A LESSON IN GANDHIGIRI STYLE, VIRAL VIDEO SPARKS DEBATE
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

तरुणीने धाडस दाखवत त्या तरुणाला सर्वांसमोर सुनावले. तरुणीसोबत काहीतरी चुकीचं झाल्याचं समजताच रेल्वेमधील इतर प्रवासी तरुणीच्या मदतीला धावून आले. प्रवाशांनी संबंधित तरुणाला पकडून गांधीगिरी स्टाईलने त्याच्या हातात बांगड्या घालण्यात आल्या. तसेच त्याच्या ओठांवर लिपस्टिक आणि चेहऱ्यावर लाली लावली. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ रेल्वे डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तरुणीला पाठिंबा दिला.

AKOLA TRAIN HARASSMENT CASE: WOMEN TEACH HARASSER A LESSON IN GANDHIGIRI STYLE, VIRAL VIDEO SPARKS DEBATE
Health Care : पावसाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी होते का? वेळेत जाणून घ्या नाहीतर...

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले असून महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी अशा घटनांमध्ये कायदेशीर कारवाईलाही प्राधान्य दिले पाहिजे, असे मत नोंदवले आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com