

अजित पवार विमान अपघातावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र
अमोल मिटकरी यांनी पायलट ‘सुसाईड बॉम्बर’ होता का असा सवाल उपस्थित केला
रोहित पवारांनी याआधीच पायलटवर घातपाताचा संशय व्यक्त केला होता
अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांनंतर आमदार अमोल मिटकरी यांनीही पायलटवर संशय व्यक्त केलाय. अजित पवार यांच्या विमानाचा पायलट हा सुसाईड बॉम्बर होता का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आज खळबळजनक आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी पायलटवर संशय व्यक्त केलाय. पायलटनं जाणूनबुजून विमान खाली पाडलं, त्याला कोणीतरी ब्लॅकमेल केले असावं, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
आता आमदार अमोल मिटकरी यांनाही पायलटबाबत मोठा दावा, केला आहे. दादांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर याला पैसे देण्याचं आमिष देण्यात आलं असावं. 50 कोटी रुपयाचे विमे ज्या पद्धतीने काढल्या गेले, त्या कंपनीचे सुसाईड बॉम्ब म्हणून त्याचा वापर झाला असावा ही माझी पूर्वी शंका होती, आताही आहे. त्याला तशा प्रकारे विमान उडवण्यास सांगितले असेल. ज्याप्रकारे लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या करताना जी महिला होती, ती हार घालायला आली. त्यावेळी बॉम्ब स्फोट घडवून आणत राजीव गांधींची हत्या करण्यात आली. म्हणजे ती सुसाईड बॉम्बर होती तशा पद्धतीने हा पायलट सुसाईड बॉम्बर होता का?
याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे आणि कंपनीवर एफआर का नाही? एसआर कंपनीचा जर इतकी नादुरुस्त कंपनी आहे तर आतापर्यंत एखादा कंत्राटदार चुकला तर त्याचं रजिस्ट्रेशन रद्द होतं. एखादा व्यक्ती नरहरी हिरवाळ साहेबांच्या दालनामध्ये साधारण काही १५ ते २०००० रुपये लास देण्याचा प्रकार घडला त्याला पकडलं. व्हीएसआर कंपनीच्या चुकीमुळे राज्याचा प्रमुख नेता मारला गेलाय, त्यांच्यावर साधा एफआयआर पण झालेला नाही त्याच्यामुळे मला, असं वाटते की तो सुसाईड बॉम्बर म्हणूनच पाठवलेला असावा.
रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने व्हीएसआर कंपनीच्या संदर्भात अगदी बारकावे स्पष्ट केलेले आहेत त्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. कोणीतरी व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय कदाचित डीजीसीए डीजीसीएच्या माध्यमातून व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय.
विमान अपघातप्रकरणाचा उलगडा होण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु अजितदादांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्स जळाल्याचं सांगितलं जात आहे. त्याला डिकोड करण्यास त्यातील माहिती रिकव्हर करण्यासाठी ब्लॅक बॉक्सला आता विदेशात पाठवण्यात येणार आहे. पण ते सुद्धा दादांच्या अपघाती मृत्यूच्या १७ दिवसांनी मग १७ दिवसांनी फक्त ब्लॅक बॉक्स जळला ही माहिती जर प्राप्त होत असेल, तर मग तपास यंत्रणा संतगतीने तपास करतेय, असं अमोल मिटकरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.