Ajit Pawar Death: पायलटचा ट्रॉफिक कंट्रोलला कॉल अन्...; अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वी काय झालं?

Ajit Pawar Plane Crash Death: अजित पवार यांचं विमान अपघातात मृत्यू झालाय. बारामती विमानतळाजवळ अपघात झालाय. विमान अपघातापूर्वी काय घडले याची माहिती समोर आलीय.
Ajit Pawar Plane Crash Death:
Ajit Pawar Plane Crash Death:
Published On
Summary
  • पायलटनं हवामानाबद्दल एअर ट्राफिक कंट्रोलला माहिती विचारली.

  • पायलटनं पुन्हा रनवे दिसलायला लागला आहे असं ATCला सांगितलं.

  • ATCकडून वैमानिकाला विमान पुन्हा हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असतानाच दुर्घटना घडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीसाठी विमानाने आले होते.

Ajit Pawar Plane Crash Death:
मुलगा सकाळी सकाळी घरातून बाहेर पडला, टीव्हीवर विमान अपघातात मृत्यूची बातमी बघितली अन् आईच्या अश्रूंचा बांध फुटला

यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. अपघात घडण्यापूर्वी विमानात काय घडलं याची माहिती समोर आलीय. दरम्यान विमान अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त झालेलं विमान लिअरजेट ४५ व्हीटी-एसएसके नोंदणी क्रमांकाचे होते. हे विमान दिल्लीस्थित एका खासगी कंपनी व्हीएसआरद्वारे चालवले जात होते.

Ajit Pawar Plane Crash Death:
अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

दरम्यान अपघातापूर्वी विमानात काय घडलं? विमानात काही बिघाड होता का? याचा तपास केला जात आहे. दरम्यान अपघात घडण्यापूर्वी अजित पवार यांच्या विमानाच्या पायटलनं लँडिंग करण्यापूर्वी एअर ट्रॉफिक कंट्रोलशी संपर्क हवामानाबद्दल माहिती विचारली होती. बारामती रनवे दिसत नसल्याचं वैमानिकनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं. सुरुवातीला ट्राफिक कंट्रोलनं त्यांना त्यांना हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर पायलटनं पुन्हा रनवे दिसयला लागल्याचं सांगितलं. त्यानंतर विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

फ्लाइट डेटानुसार, मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लगेचच सकाळी ७:५६ च्या सुमारास विमान प्रथम रडारवर दिसले. सकाळी ८:१० च्या सुमारास ते पूर्णपणे हवेत होते. बारामतीजवळ येत असताना, विमान लँडिंग मार्गावर असताना सकाळी ८:३७ वाजता विमानतळापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर रडारवरून गायब झाले. Flightradar24 नावाच्या ओपन-सोर्स फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार, सुमारे दोन मिनिटांनंतर सकाळी ८:३९ वाजता विमान रडारवर पुन्हा दिसले.

फ्लाइट ट्रॅकवर विमान त्याच्या मार्गावर फिरताना दिसले त्याला 'गो-अराउंड' मॅन्युवर म्हटलं जातं. यानंतर विमान सकाळी ८:४३ वाजता रडारवरून गायब झाले. सकाळी ८:३९ वाजता जेव्हा विमान रडारवर पुन्हा दिसले तेव्हा त्याची उंची वाढत असल्याचे नोंदवले गेले. यामुळे दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न झाल्याचे दिसतंय. सर्किट पूर्ण केल्यानंतर विमान पुन्हा खाली उतरू लागले. लँडिंगचा हा दुसरा प्रयत्न होता पण काही क्षणांनंतर विमान शेवटच्या वेळी रडारवरून गायब झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com