अजितदादांच्या विमानातून कुणाची उडी? राष्ट्रवादीच्या आमदाराची धक्कादायक माहिती

Mystery Deepens Over Claims Surrounding Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या मृत्यूवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच संशय व्यक्त केला जातोय... आमदार अमोल मिटकरींनी तर मास्टरमाईंडलाच थेट इशारा दिलाय... तर दुसरीकडे दादांच्या विमानातून बाहेर येण्यासाठी कुणी उडी मारली? मिटकरी नेमकं काय म्हणाले?
NCP MLA Amol Mitkari addressing the media over claims related to the Ajit Pawar plane crash controversy.
NCP MLA Amol Mitkari addressing the media over claims related to the Ajit Pawar plane crash controversy.Saam Tv
Published On

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचं गूढ उकलण्याऐवजी ते अधिकच गडद होतयं.... हा फक्त अपघात आहे की घातपात? यावरून अनेक नेते आपापलं मत व्यक्त करत आहेत...आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.. अशातच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी अपघातामागे घातपात उघड झाला तर मास्टरमाईंडच्या घरात पाळणा हलवणारा कुणी राहणार नाही, असा थेट इशारा दिलाय...

या इशाऱ्याबरोबरच मिटकरींनी अपघातावेळी विमानातून उडी मारण्यासाठी कुणीतरी धडपड करत होतं असं स्थानिक सरपंचांनं आपल्याला सांगितल्यांच दावा केलाय..मात्र स्थानिक सरपंच कल्याण आटोळेंनी नेमकं काय म्हटलंय पाहा...याआधीही अमोल मिटकरींनी अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर प्रश्नही उपस्थित केलेत... विमानातून सहा लोकं प्रवास करत असल्याची माहिती डीजीसीएने दिली असताना पोलिसांना प्रत्यक्षात 5 जणांचेच मृतदेह कसे मिळाले? सिंग नावाचा पायलट येणार होता तर ऐनवेळी कपूर नावाचा पायलट का आला? स्फोट होऊन विमान जळून खाक होतं, मग कागदपत्रे कशी जळत नाहीत?कंपनीच्या या विमानावर 1 वर्षांपासून बंदी होती का

शरद पवारांनी मात्र हे सारे दावे फेटाळून लावलेत या विमान अपघाताचा तपास सध्या सीआयडीकडे सोपवण्यात आलाय..नेत्याचे आरोप-प्रत्यारोप ,खळबळजनक दावे यामुळे अजित पवारांच्या अपघाताचा सस्पेन्स वाढत चाललाय.त्यामुळे अपघाताच्या तपासाला वेग देत खरी माहिती समोर येणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com