अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्वाची माहिती, नागरी उड्डाण मंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी AAIB कडून पारदर्शी चौकशी सुरू असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे. ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून अहवाल राज्य सरकारला दिला जाणार आहे.
Investigators examine the crash site as AAIB begins probe into Ajit Pawar plane accident.
Investigators examine the crash site as AAIB begins probe into Ajit Pawar plane accident.Saam Tv
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघाताने निधन झाले. या अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शंका व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मोठे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना लिहिले होते. यावरच आता केंद्रीय संस्थेकडून आता तपास होणार आहे. विमान अपघात तपास ब्यूरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे.

Investigators examine the crash site as AAIB begins probe into Ajit Pawar plane accident.
VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय म्हटलंय?

अजित पवारांच्या विमानाचा अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि वेळेत होईल.या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डर्स ऑपरेशन तपशील घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यामध्ये मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारला आम्ही देऊ.

Investigators examine the crash site as AAIB begins probe into Ajit Pawar plane accident.
ZP Election: झेडपी निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागणी काय होती?

अजित पवारांसारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांना यामध्ये प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी अशीही मागणी या पत्रातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com