कोलंबियामध्ये १५ जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात
या विमानात कोलंबियन संसदेचे सदस्य आणि आगामी निवडणुकीतील एका निवडणूक उमेदवार होता
कॅटाटुम्बोच्या डोंगराळ भागात अवशेष सापडले
तांत्रिक बिघाड किंवा हवामान कारणीभूत असण्याची शक्यता
कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. १५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते, ज्यात कोलंबियन संसदेचे सदस्य (चेंबर ऑफ डेप्युटीज) आणि आगामी निवडणुकीतील एका उमेदवाराचा समावेश होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीचक्राफ्ट १९०० हे व्यवसायिक विमान बुधवारी सकाळी ११:४२ वाजता कुकुटा येथून १५ जणांना घेऊन आकाशात झेपावले. परंतु लँडिंगच्या अवघ्या ११ मिनिटांपूर्वी या विमानाचा संपर्क तुटला. विमानाचा शेवटचा रडार संपर्क कॅटाटुम्बो परिसरात नोंदवण्यात आला होता. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.
विमानाचे अवशेष कॅटाटुम्बोच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात आढळले. हा परिसर खराब हवामान आणि खडकाळ टेकड्यांसाठी ओळखला जातो, ज्यामुळे शोध मोहिमेत मोठे आव्हान निर्माण झाले. हा अपघात इतका भीषण होता की, या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा समावेश होता. या विमान प्रवासात कोलंबियन संसदेचे सदस्य होते आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकीचा एक उमेदवार देखील होता.
स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे कि, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अवशेषांची तपासणी करत आहेत. तथापि, तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. कोलंबियन एरोस्पेस फोर्स आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या अपघात तपास संचालनालयाने तातडीने शोध आणि बचाव प्रोटोकॉल सक्रिय केले. नातेवाईकांना मदत करण्यासाठी (601) 919 3333 हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.