ajit pawar on sujay vikhe patil
ajit pawar on sujay vikhe patilSaam TV

Ratnagiri: सुजय विखे- पाटलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : अजित पवार

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी आज खेड येथे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अडचणी संदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य सचिव यांना फोन करून संबंधित विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठीचे निर्देश दिले.

रत्नागिरी : राज्य सरकारचा कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर घेतले जातात. भाजपाचे सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांच्या टिकेस उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी उत्तर देताना फारसे महत्व दिले नाही. ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवतोय त्यांना आम्ही साथ देत आहाेत. यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या डायरीत मातोश्री असा उल्लेख सापडला आहे. प्रत्येक जण आईला मातोश्री असे देखील संबाेधितात. त्यामुळे त्यांनी तसं लिहिले असेल असे ही पवार यांनी रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात नमूद केले. (ajit pawar latest marathi news)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ज्यांना कुणाला उद्योग नाहीत ते अशी टीका टिप्पणी करत असतात. आमच्यावर टीका टिप्पणी करायची. आम्ही त्याला उत्तर द्यायचं. तुम्ही (पत्रकारांना उद्देशून) काय साधणार आहात, राज्याची जनता काय साधणार आहे, याचाही विचार करा. दरम्यान ज्यांनी केलेल्या स्टेटमेंट गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटवर आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेटमेंटला फार काही महत्व द्यायचं कारण नाही असे सूजय विखे पाटलांच्या टीकेस उत्तर देताना पवार यांनी स्पष्ट केले.

ajit pawar on sujay vikhe patil
Sangli: पाेलिसांचे कडे ताेडत धनगर समाजाची अहिल्यादेवी होळकर स्मारकाकडे कूच

आरोग्य विभागाच्या अडचणीची तात्काळ उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी आज खेड येथे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अडचणी संदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य सचिव यांना फोन करून संबंधित विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठीचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांची घेतली हजेरी

आढावा बैठक सुरु होण्यापुर्वी अजित पवार यांनी रत्नागिरीतील अधिका-यांची हजेरी घेतली. कोणता अधिकारी बैठकीला हजर राहिलेला नाही याची माहिती घेतली. त्याचबरोबर अधिका-यांना देखील धारेवर धरले.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar on sujay vikhe patil
Shimgotsava: ढाेल ताशांचा गजर; शिमगोत्सवात महिलांनी नाचवली पालखी
ajit pawar on sujay vikhe patil
Ratnagiri: ...तर शिवसेना रिफायनरीसाठी आग्रही राहील : उदय सामंत
ajit pawar on sujay vikhe patil
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com