Ratnagiri: ...तर शिवसेना रिफायनरीसाठी आग्रही राहील : उदय सामंत

स्थानिकांचे प्रश्न सुटणार असतील तर सरकार सकारात्मक भुमिका घेईल.
uday samant
uday samantSaam Tv
Published On

रत्नागिरी : रिफायनरीबाबत (refinery project) स्थानिकांनी समर्थन केल्यास शिवसेना (shivsena) देखील रिफायनरी बाबत सकारात्मक निर्णय घेईल असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी येथे नमूद केले. सामंत यांनी माध्यमांशी बाेलताना रिफायनरीबाबतची भुमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. (uday samant latest marathi news)

मंत्री सामंत म्हणाले यापुर्वी नाणार प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रद्द केला. रिफायनरीसाठी स्थानिकांनी समर्थन केल्यास शिवसेना देखील रिफायनरी बाबत समर्थन देईल. स्थानिकांना राेजगार मिळणार असेल तर उत्तमच. त्यांचे प्रश्न सुटणार असतील तर सरकार सकारात्मक भुमिका घेईल.

uday samant
Shimgotsava: ढाेल ताशांचा गजर; शिमगोत्सवात महिलांनी नाचवली पालखी

स्थानिकांना काय देणार आहाेत हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. सरकारचा मी देखील भाग आहे. युवकांना राेजगार दिला पाहिजे. लाेकांमधील गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे असेही सामंत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

uday samant
Ratnagiri: सोमय्यांचा शनिवारी दापोली दाैरा; राष्ट्रवादीसह सेनेनं दिला इशारा
uday samant
Mumbai: 'मला काेण थांबवतेय पाहू? ठाकरेंची माफिया सेना की पवारांचे राडेबाज गुंड'
uday samant
Good News: तिरुपतीला जाणा-या भाविकांसाठी रेल्वेचा निर्णय; २ ऑगस्टपर्यंत धावणार गाड्या
uday samant
Lakshya Sen: 'ऑल इंग्लंड' नंतर बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत लक्ष्य सेनची आघाडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com