अजितदादांचे मावळे पुरून उरले, पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडेच

NCP Retains Pune Zilla Parishad After Ajit Pawar Death: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परीषदेचा गड कायम राखलाय. अजित पवारांचं निधन झाल्यानंतर एकट्या पडलेल्या कार्यकर्त्यांनी हा विजय दादांना समर्पित केलाय. महापालिकेतील अपयशानंतर ग्रामीण भागात पक्षाला मिळालेलं यश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा आहे.
NCP workers celebrate with party flags and clock symbol after a decisive victory in Pune Zilla Parishad elections.
NCP workers celebrate with party flags and clock symbol after a decisive victory in Pune Zilla Parishad elections.Saam Tv
Published On

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देत पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. काँग्रेस तर पुणे जिल्ह्यातून हद्दपार झालीय. बारामतीसह इंदापूर, मावळ, जुन्नर, आंबेगावमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली.महापालिका पाठोपाठ जिल्हा परीषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणुक लढवली आणि एकूण 73 जागापैंकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकत राष्ट्रवादीने बहुमत मिळवलं. . दादा अपघाती मृत्युनंतरची ही पहिलीच निवडणूक..या निवडणुकीला सामोर जात त्यांच्या मावळ्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखलाय.या विजयानंतर अनेक उमेदवार दादांच्या आठवणीनं भावुक झाले.

मावळमध्ये तर भाजपचा सुपडा साफ झालाय.

जिल्हा परीषदेच्या 5 आणि पंचायत समितीमध्ये 10 अशा

सर्व 15 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

2017 मध्ये पुणे जिल्हा परीषद निवडणुकीत 44 जागा जिंकत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली होती. 2026 मध्ये अर्धशतक पार करत पक्षाने घवघवीत यश मिळवलं आहे. दादांच्या अपघाती मृत्यूनंतरची अवघ्या दहा दिवसांनंतर झालेली ही निवडणूक..त्यामुळे मतदारांमध्ये सहानभूती तर होतीच पण कार्यकर्तेही लढले..जिल्हा परीषदेचा गड राखून अजितदादांच्या मावळ्यांनी पुणे जिल्हा परीषदेचा 'दादा' राष्ट्रवादीच असल्याचं दाखवून दिलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com