राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठी राज्यभरात ओळखले जातात. कडक शिस्तीच्या अजित पवारांचे निवडणुकीच्या प्रचारातील एक वक्तव्य आता त्यांना अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. कारण या वक्तव्यांवरुन मतदारांमध्ये दहशत पसरल्याचा आरोप करत विरोधकांनी रान पेटवलंय. असं नेमकं अजित पवार काय म्हणाले ? पाहा
ऐकलंत अजित पवारांनी काय म्हटलंय. ते.. तुम्ही जर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधी देणार नाही असं थेट अजित पवारांनी मतदारांना बजावलंय. त्यामुळे अजित पवारांच्या या विधानांची राज्यभरात चर्चा सुरु झालीये. कारण राज्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असून तेच राज्याचे अर्थमंत्री आहेत. निधी देण्याचं काम हे अर्थ खात्याच्या अखत्यारीत येत असून तेच निधी देणारे असल्यानं यावक्तव्याचा निवडणूकांवर परिणाम होणार असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय.
निवडणुकीत आश्वासनं देणं सर्वमान्य आहे. पण पदाचा दाखला देत मतदारांना घाबरवून मतं मिळवणं हे लोकशाहीच्या आणि आचारसंहितेच्या निकषांना हरताळ फासण्यासारखं आहे. राज्याचे अर्थमंत्रीच जर 'निधी'ला राजकीय 'शस्त्र' बनवत असतील, तर याचा जनमानसावर 'दहशतवजा दडपण' निर्माण होते. आता प्रश्न हाच आहे की, लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या या वक्तव्याची निवडणूक आयोग गांभीर्याने दखल घेऊन कारवाईचा 'काट' अजित दादांवर मारणार की नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.