

Ajit pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आज सकाळी निधन झाले. सकाळी ८.५० वाजता बारामतीमध्ये अजित पवार यांच्या यांच्या विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात झाला. बुधवार महाराष्ट्रासाठी घातवार ठरलाय, अजित पवार सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी खाजगी VSR कंपनीच्या विमानाने रवाना झाले होते. बारामतीत लँडिंगवेळी ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासोबत मुंबईचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचेही निधन झाले.
खाजगी VSR कंपनीच्या विमानाने अजित पवार बारामतीसाठी रवाना झाले होते. सकाळी ८.१० वाजता अजित पवार यांनी मुंबईहून बारामतीकडे प्रस्थान केले. ८.५० वाजता बारामती विमानतळाच्या जवळच त्यांचं विमान कोसळलं. यामध्ये अजित पवार, विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचं निधन झाले.
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही दुख व्यक्त करण्यात आले. राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला.
धनंजय मुंडेना अश्रू अनावर...
अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे तातडीने बारामतीकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्याशी बोलताना त्यांना भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले. अजितदादा आणि धनंजय मुंडे यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. "पक्षात तुमचा सर्वात लाडका कोण?" असे विचारल्यावर दादा नेहमी मोठ्या अभिमानाने धनंजय मुंडे यांचे नाव घेत असत. आज आपल्या या हक्काच्या आधारवडाल्या गमावल्याचे दुःख धनंजय मुंडे यांच्यासाठी शब्दांच्या पलीकडचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.