
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय सध्या फक्त मुंबईपुरता आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मुंबईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याची मागणी केली आहे, परंतु याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असे मानले जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, मुंबईत स्वबळाचा मुद्दा मांडला तरी त्याचा इतर पक्षांशी असलेल्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात स्वबळाची भूमिका सध्या फक्त मुंबईपुरती आहे, असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणे अनिवार्य होतं, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शिंदे यांचा मुख्य अजेंडा सत्तेत राहणे होता, आणि त्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी तसेच कारवाई होऊ नये म्हणून सत्तेत प्रवेश केला, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत सांगितले की, भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना शिंदे गटातही पक्ष फुटेल, असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांचे म्हणणे आहे की भाजपच्या तोंडाला पक्ष फोडीचे रक्त लागले आहे, आणि यानंतर देशात नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांचेही पक्ष फुटले जातील. यावरून राऊत यांनी भाजपच्या राजकीय धोरणावर सवाल उपस्थित केला.
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मनसे आणि ठाकरे शिवसेना कधीही एकत्र येणार नाहीत. आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे, आणि जे पक्ष महाराष्ट्राची लूट करतात, तसेच त्यांना मदत करणारे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत आम्ही कधीही सहकार्य करणार नाही. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकत्र येण्याची शक्यता नाही, असं राऊत यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.