
आज हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज नव्हता मात्र स्थानिक वातावरनामुळे पावसाच्या सरी असल्याचं बोललं जातं आहे..
नागपुरात काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सरीला सुरवात झालीय
कोकणामध्ये पावसाचा जोर कायम राहणार, चार जिल्ह्यांना अलर्ट
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाच्या विसर्गात आज दिवसातून दुसऱ्यांदा मोठी वाढ केली आहे. सध्या धरणाचे ९ दरवाजे १ मीटरनं तर, २४ दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून १ लक्ष ६७ हजार १६७ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतं आहे. सकाळच्या तुलनेत २५ हजार ३०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी २ दरवाजे १ मीटरनं तर, ३१ दरवाजे अर्धा मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने राज्य शासनाला जबाबदार धरत आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून कर्जबाजारीपणा बद्दल आणि आपल्या आत्महत्येला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्याऐवजी समिती स्थापन करून पब आणि बारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न?
कल्याणी नगर,कोरेगाव पार्क, मुंढवा, परिसरातील पब आणि बारवर शिस्त लावण्यासाठी पोलिसांची समिती स्थापन
पुणे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती उपाययोजना करणार.
यवतमाळच्या वणी शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट आणि त्यामुळे वाढलेले अपघातांचे सत्र यामुळे नागरिक हैराण झाले असताना, या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच धडा शिकवला आहे.मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी अनोखे आंदोलन करत थेट 'ढोरकी'चा अवतार घेतला आणि शहरातील सर्व मोकाट जनावरे गोळा करून त्यांना चक्क नगर परिषदेच्या कार्यालयात नेऊन सोडून दिले.नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.दरम्यान मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, शहरातील कोंडवाडे आणि उपलब्ध असलेल्या गोशाळांची क्षमता तपासणी करून पुढील पाच दिवसांत ही सर्व मोकाट जनावरे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येतील. मुख्याधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज ठाकरे यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुंबईच्या विकासाचा आराखडा त्यांच्याकडे सुपूर्द केला. या भेटीवरून कदमांनी शंका उपस्थित करत म्हटले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड तयार होईल आणि महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात येईल अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या. पण त्या आणाभाका आता हवेतच विरल्या आहेत, हे महाराष्ट्राने पाहिले पाहिजे.
पालघर मध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला खिंडार . शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश . भाजपने महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची टीका . आमचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याआधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीचा एकदा विचार करायला हवा होता. पालघर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा इशारा . भाजपने आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली आता आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांची काळजी घेऊ असं सांगत जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा भाजपला इशारा .
महाराष्ट्र शासनाने गणेशीलाल राज्योत्सवहणून मान्यता दिली आहे. पुण्यामध्ये गणेशला मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो.
या उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये देशातूनच नाही तर जगभरातून भाविक दर्शनासाठी आणि गणेश महालांचे देखावे बधण्यासाठी येत असतात व विशेष म्हणजे पुणे मेट्रोची प्रवासी सेवा जिल्ला न्यायालय मेट्रो स्थानक स्वारगेट मेट्री स्थानक या भूमिगत मार्गावर सुरु इमली आहे या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई स्वारगेट ही पुण्याच्या मध्यवस्तीत असलेली स्थानके सुरु झाली आहेत.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 22117 क्युसेक कमी करून संध्याकाळी 6 वाजता 17429क्यूसेक करण्यात येत आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार वयेव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नाशिकचा पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांना माझा विरोध-आमदार सुहास कांदे
राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते आमदार तुमच्या सोबत आहेत का? हे एकदा तपासा...
मला रायगडचं नाही माहिती..परंतु मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ते मुख्यमंत्री ठरवतील..
भुजबळ साहेबांबरोबर एकही आमदार नाही ते एकटेच आहेत.
विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट
सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक' प्रकल्पाचा आढावा घेतला.
या भेटीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर. उपस्थित होते.
कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड
बाजारपेठेत घेवारी नामक नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर घातली धाड
नितेश राणेंच्या धाडी नंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल
पोलीसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्याची मटका अड्ड्यावर धाड
पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणेंनी स्वतः जाऊन केलेली ही पहीलीच धडक कारवाई
या कारवाईत घेवारी नामक व्यक्तीसह नऊ ते दहाजण मटका घेताना आले आढळून
पोलीस कारवाई सुरू
- मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली तब्बल २ तास कुंभाची आढावा बैठक
- साधुग्राम, रिंगरोड, सुशोभीकरण प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि अन्य कामांचा घेतला आढावा
- साधुग्रामच्या भूसंपादनाबाबत प्रशासकीय पातळीवर कुठलीही हालचाल नाही
- नव्या रिंगरोडबाबतही अनिश्चितता कायम, नदी स्वच्छताबाबत नियोजनावर भुजबळांची नाराजी
- प्रस्तावित विकास कामांच्या संदर्भातही दिरंगाई होत असल्यानं भुजबळ नाखूष
- अवघ्या दीड वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपेलेला असतांना कामांना सुरुवात नसल्यानं व्यक्त केली चिंता
पुणे जिल्हाधिकारी कार्यालसमोर संभाजी ब्रिगेड एकदिवसीय लक्षवेध आंदोलन
अति पावसामुळे शेतकर्यांचे झालेले नुकसान, शेतकरी कर्जमाफी, मराठा व धनगर समाजाचे आरक्षण, ईव्हीएम मशीन विषयावर आंदोलन
शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
तथाकथित गोरक्षकांनी शेतकऱ्यांना त्रास दिला तर त्यांच्या ढुंगणात नांगराचा फाळ घालू असा गोरक्षकाना इशारा देताना आमदार सदाभाऊ यांची जीभ घसरली
गोरक्षकांच्या विरोधात मी भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो. मला त्यांच्या कडून धमक्या यायला लागल्या. पण माझा वाटेला जाऊ नका गेला तर अवघड होईल असा इशारा दिला आहे.
गोरक्षकांच्या नावाखाली गब्बर सिंग यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत.
गोरक्षक आणि पोलिस मिळून शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकत असल्याचा गंभीर आरोप ही आमदार खोत यांनी केला.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीचं रौद्र रूप
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील drone मधून घेतलेली ही दृश्य
सध्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे
पाण्याच्या विसर्गामुळे मुठा नदीचे पात्र ओवर फ्लो झाले
ड्रोन मधून दिसणारा भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली
पुणे रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या मोठ्या टोळीच्या प्रमुखाला पोलिसांनी दिल्लीतून घेतलं ताब्यात
रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या रमेश उर्फ मोठा असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव
आरोपी रमेश हा पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मदत करण्याच्या बहाना करत पुणे रेल्वे स्थानक आणि मिरज रेल्वे स्थानकावर अनेक चोऱ्या केल्या होत्या.
आरोपीने दहा तोळ्यापेक्षा अधिक सोनं चोरलं होतं.
याचा तपास रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती आणि पोलिसांना आरोपी रमेशच्या दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे.
अधिक तपास रेल्वे पोलिस करत आहेत.
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवून जातीय तेढ रोखावा, दुध,कांदा,कापूस
दर वाढवावा, अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच निवडणुका बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला जाग यावी यासाठी भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले. जर सरकारने याची तत्काळ दखल घेतली नाही तर यापुढे मंत्र्यांच्या गाड्या, घरासमोर लक्षवेध आंदोलन करण्याचा इशारा राजेश परकाळे यांनी दिला आहे.
पुणे ब्रेक
नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध मानवी हाडाचा सांगाडा सापडला .
पोलिसांकडून या सांगाड्या संदर्भात तपास सुरु
रस्त्याच्या मधोमध सांगाडा पडल्याने वाहतूक कोंडी
बोगस मतदारांच्या विरोधात कराडमध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी उपोषण केले आहे. या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जोपर्यंत बोगस मतदारांवर गुन्हे दाखल होत नाहीत आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा गणेश पवार यांनी दिला. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी..
धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सरकारी शाळांमधील भौतिक सुविधांच्या अभावाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत "झोपा काढा" हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आलय.जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग फक्त शिक्षणातूनच सुकर होऊ शकतो, हे सर्वश्रुत असतानाही नगरपरिषद प्रशासन,जिल्हा प्रशासन व शासनाकडून सरकारी शाळांच्या मूलभूत गरजांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.आम आदमी पार्टीच्या वतीने शाळा पाहणीदरम्यान नगरपरिषद शाळांमध्ये स्वच्छ शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी,परिसर स्वच्छता, खेळाचे मैदान यांसारख्या किमान सोयींचा गंभीरपणे अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने या विरोधात झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलय.
नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आक्रमक
- अजून परवानगी मिळत नसल्याने आक्रमक
- नाशिक सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी छगन भुजबळांच्या भेटीला
- दोनच दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी
- परवानग्या न भेटणे, जाहिरात कर माफ न होणे, रस्त्यावरील न खड्डे बुजवणे यासह मंडळांसमोर अनेक अडचणी
- शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीला परवानगी देण्याची देखील आहे प्रमुख मागणी
- परवानगी मिळो किंवा नाही, आम्ही गणेश उत्सव साजरा करणार गणेश मंडळाची भूमिका
हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी केली अन् कंपनी काढून बेकायदेशीर वेबसाईट विकल्या याप्रकरणी तीन माजी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. हिंजवडी आयटी नगरीतील फ्युचरीइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीतील माजी कर्मचाऱ्यांनी गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन ची माहिती चोरून, तब्बल 82 कोटी रुपयांचे कंपनीचे नुकसान केले आहे, ही घटना एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधी मध्ये घडली होती, याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही चोरी कंपनीमधीलच माझी तीन कर्मचाऱ्यांनी आणि एका महिलेने मिळून केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
रायगड समुद्रात बोट बुडाली. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक झालीय.शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने थाळीनाद आंदोलन करत सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह मराठा,धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडावा यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात येतय. दरम्यान आमच्या मागण्याची सरकारने दखल घेतली नाही तर राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मंत्रालयावर धडकणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सुदर्शन तारक यांनी दिला आहे..
* ग्रामसभा सुरू असतानाच झाला राडा
* ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी
* विषय मंजुरीवरून राडा झाल्याची माहिती..
* काल ग्रामसभा सुरू असताना घडली घटना..
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत सोडले जात असून नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिलेला आहे. गेल्या दोन दिवसापासून पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वरील सर्व धरणांचे पाणी मुळा-मुठा आणि इंद्रायणी मार्फत उजनी धरणाकडे येत असल्याने आधीच 103% भरलेल्या उजनी धरणात पाणी साठवायला जागा उरलेली नाही. यातच सध्या उजनी धरणाकडे तब्बल एक लाख 77 हजार क्युसेक विसर्गने पाणी येत असल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग अजूनही वाढू शकणार आहे. या पाण्यामुळे उजनी धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या पंढरपूर सारख्या शहराला पुराचा धोका बसू लागला असून नदीकाठच्या काही नागरी वसाहतीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग अजून दहा ते वीस हजार क्यूसेखने वाढवावा लागणार असून धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात हा विसर्ग प्रशासनाला ठेवावा लागणार आहे.
वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांचा उद्या शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती मध्ये बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साजांनी बाजारपेठ सजली आहे..बैलपोळ्यानिमित्त बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य गोंडे, झुल, हार, रंग, घंटा,माळा यांची मोठी खरेदी केली जाते. यासाठी अमरावतीतील इतवारा बाजार परंपरेप्रमाणे सजून तयार झाला आहे. रस्त्यावर रंगीबेरंगी झुल,काचमणींच्या माळा,चमकदार कापडं,घंटा यांची रेलचेल दिसत आहे.दुकानदारांनी वेगवेगळी नवी डिझाईनची साहित्य बाजारात आणली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हिंगणघाट येथे पोहोचले
अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे माजी आमदार राजू तिमांडे यांचा होणार पक्षप्रवेश
राजू तिमांडे यांच्या पक्षप्रवेशाने महायुतीची ताकद वाढणार
माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा होणार अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे होणार लोकार्पण
मनमाड शहरात अज्ञात लोकांनी घराजवळ लावलेल्या 2 दुचाकी जळल्याचा प्रकार समोर आलाय, मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात मात्र त्याचे लोण मनमाड शहरात बघावयास मिळाले आहे,शहरातील इंडियन हायस्कुल समोरील ऐका घराजवळ लावलेल्या 2 दुचाकी अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकी जाळून खाक झाल्या,हा प्रकार नेमका कोणी व कशा साठी केला हे मात्र समजू शकले नाही,दरम्यान या बाबत मनमाड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच पालघर मध्ये धक्का. पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम आज मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह करणार भाजपमध्ये प्रवेश . प्रकाश निकम यांच्यासोबत युवा सेना जिल्हाप्रमुख रिकी रत्नाकर देखील भाजपमध्ये करणार पक्ष प्रवेश . निकम यांच्यासोबत जव्हार मोखाड्यातील बडे नेते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य देखील पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती . भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी निकम आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना . प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार . बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने प्रकाश निकम नाराज असल्याची चर्चा .
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात आहेत. ते प्रमाणपत्र वेळेत आणि योग्य प्रकारे दिले जात आहेत का? कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे का? याबाबतची तपासणी शिंदे समितीच्या काही सदस्यांकडून केली जात आहे. त्यासाठी आज सकाळपासून बीडमध्ये शिंदे समितीचे काही सदस्य दाखल झाले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळांने शिंदे समितीच्या सदस्यांची भेट घेतली आहे.
इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर गावच्या हद्दीत आज पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. एका क्लुझर जीपने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात कर्नाटकातील यल्लावा चौंडकी या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून १३ प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींना भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल सह इंदापूरमधील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालया समोरच मागच्या सहा दिवसापासून साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही
१९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी ने वसई विरार नालासोपारा करांची दैनीय अवस्था केली आहे. आजही शहरातील अनेक सोसायटी, सकल भागातील रस्ते पाण्याखाली आहेत.
महापालिकेने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षण पंप लावल्याचा दावा केल्या जातोय मात्र पालिका आपल्या कार्यालय समोरील पाण्याचा निचरा करण्यातच अपयशी घरातच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
बाळासाहेब थोरात पोलिसांवर संतापले...
थोरातांचा पोलिसांना इशारा...
मोर्चेकऱ्यांच्या गाड्या शहराबाहेर अडवू नका...
आमच्या लोकांना मोर्चास्थळी येऊद्या...
पोलिस कुणाचे घरगडी नाही...
कुणाच्या सांगण्यावरून गाड्या अडवता?..
गाड्या त्वरित सोडा...
निषेध सभेच्या सुरूवातीलाच थोरातांचा पोलिसांना इशारा...
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीमध्ये परभणी तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे समर्थक देखील परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसत आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन...
थोरात यांचे समर्थक आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी...
बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, बहीण दुर्गा तांबे, कन्या जयश्री थोरात मोर्चात सहभागी...
कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ भव्य मोर्चाला सुरुवात...
संग्राम भंडारे यांच्यावर कारवाईची मागणी...
गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यातील मेहेकर व लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.. या पावसाने दोन तालुक्यात हाहाकार उडाला आहे.. सर्वात जास्त मेहेकर तालुक्यात नुकसान झाले आहे.. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले सोयाबीन चे पिक नष्ट झाले आहे..
गेल्या 5 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आला आहे. याच दरम्यान, नदी पार करत असताना एक मालवाहू टेम्पो पुराच्या प्रवाहात अडकला. प्रसंगावधान राखत स्थानिक युवकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश आले. या प्रकारामुळे मोठा अनर्थ टळला. हा टेम्पो गावात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी येत होता. मात्र नदीच्या पुलावरून जाताना पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना चालकाने गाडी पुढे घेतली आणि टेम्पो मधोमध अडकून बसला. टेम्पो पाण्यात अडकताच चालकाने आरडा ओरड सुरू केला. परिस्थितीची माहिती मिळताच ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व काही स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोऱ्या व जिसीपीचा साहाय्याने आणि मोठ्या काळजीपूर्वक पाण्याच्या प्रवाहातून टेम्पो बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज राज ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या दोघांमध्ये पाऊण चर्चा सुरु होती. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
मावळात गेले चार-पाच दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीनेही रुद्ररूप धारण केलेले आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी कुंडमळ्यातील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र तो अपघात ग्रस्त पूल नदीपात्रातच ठेवण्यात आलेला होता. आता इंद्रायणी नदीने रुद्ररूप धारण केल्यामुळे तो लोखंडी पूल वाहून गेलेला आहे.
उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर आला आहे. पंढरपूर शहरातील सुमारे शंभर घरांमध्ये पाणी शिरले आहे तर तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांमधील ऊसाच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सध्या उजनी धरणातून भीमा नदी मध्ये 1 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपार नंतर विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाणी पातळी वाढल्याने सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठच्या पिराचीकुरोली,वाडीकुरोली,शिरढोण,कौकाळी या गावातील शेतकर्यांच्या उसासह इतर पिकांमध्ये पाणी शिरले आहे.
शहरातील कोंढवा, घोरपडी पेठ परिसरात पुणे महानगरपालिकेकडून कारवाई
अनधिकृत बांधकाम, आस्थापना आणि अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा
पुण्यातील सोमवार पेठ ,घोरपडे पेठ आणि कोंढवा परिसरात काल दिवसभर महानगरपालिकेची अतिक्रमणाची कारवाई
अनेकदा नोटीसा देऊन देखील अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने चालवला हातोडा
प्रकाशा मध्यम प्रकल्प बॅरेजचे 11 दरवाजे तर प्रकाशा मध्यम प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले पूर्ण क्षमतेने....
तापी नदीकाठचा 33 गावांना सतर्कतेच्या इशारा....
प्रकाशा धार्मिक स्थळावर तापी घाटावर जाण्यासाठी भाविकांना बंदी.....
प्रकाशा पुलावरून संत गतीने वाहतूक सुरू.....
तापी नदी काठचा नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचा आव्हान....
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी आगामी संस्था कुंभमेळाच्या नियोजनाची विशेष बैठक होणार आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद राज्य सरकारच्या स्तरावर अद्याप प्रलंबित असतांना नाशिकला पालकमंत्री पद न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत. त्यांनी जिल्ह्यात ७ आमदार असूनही राष्ट्रवादीला पालकमंत्री नाही, असं म्हणत आपला दावा या पदावर दाखवला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. यापूर्वी पालकमंत्री नसले तरी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच कुंभमेळ्याचे नियोजन बघत होते. त्यात सातत्याने ध्वजारोहणाचा मान त्यांना दिला गेल्यामुळे नाशिकचे मंत्री गण आणिआमदार दुखावले आहेत. नाशिकला अद्याप अधिकृत पालकमंत्री पद मिळाले नसले तरी जिल्ह्याचा मीच खरा पालक असं भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य या आधी देखील चर्चेत आलं होतं. आता कुंभमेळ्याची पहिल्या टप्प्यातील कामही परस्पर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे या निर्णयांबाबत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे भुजबळ घेत असलेल्या सिंहस्थ नियोजनाच्या या बैठकीकडे नाशिककरांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून भाजपमधून बंडखोरी करून दिपक केसरकर यांच्या विरोधात निवडणुक लढविलेल्या आणि याच दरम्यान नारायण राणे हे रवींद्र चव्हाण यांना त्रास देतात अशी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून खळबळ उडवून देणाऱ्या विशाल परब यांच निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकताच मुंबई येथे विशाल परब यांचा प्रवेश करून घेतला. या प्रवेशानंतर विशाल परब यांनी सिंधुदुर्गात रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल. मात्र या प्रवेशानंतर भाजप आणि शिंदे गटात नाराजी पसरली आहे. भाजपचा जिल्ह्यातील एकही बडा नेता विशाल परब यांच्या रॅलीत सहभागी झाला नाही. याच विशाल परब यांना पून्हा भाजपमध्ये प्रवेश देणार नसल्याच त्यावेळी राणेंकडून सांगण्यात आल होत. मला विचारल्याशिवाय सिंधुदुर्गात शिंदेच्या शिवसेनेत व भाजपमध्ये कोणाला प्रवेश दिला जात नाही अस अनेकदा नारायण राणे म्हणाले होते. मात्र याच राणेंना अंधारात ठेवून हा पक्ष प्रवेश देण्यात आला का असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशाल परब यांच्यावर शिंदेच्या शिवसेनेकडून लॅन्ड माफीया अशी टीका झाली होती तर राणेंनी परब हे ड्रग्स माफीया असल्याचा आरोप केला होता. मात्र याच विशाल परब यांना रवींद्र चव्हाण यांनी पक्षात पुन्हा प्रवेश देऊन राणेंना शह दिल्याच बोलल जात आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी विशाल परब यांच्या प्रवेशानंतर खोचक प्रतिक्रीया देत राणेंना डीवचल आहे. राणेंची भाजपमधील ताकद कमी झाली की रवींद्र चव्हाण राणेंना शह देतायत असा सवाल उपस्थित करत नारायण राणे आता ड्रग्स माफीयाच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणार का असा खोचक टोला लगावला आहे.
वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार ते आठवडी बाजारात जाणाऱ्या अडाण नदीवर असलेल्या पूलाची मोठी दुरावस्था झाल्याने क्षतिग्रस्त पुलावून जात असताना मोठे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा आलेल्या नदीला आल्याने पुरामुळे या पुलाची दुरावस्था झाली आहे. पुराच्या पाण्यात पुलाचा काही भाग खरडून गेला आहे. नागरिकांची या पुलावरून मोठी ये-जा असते. या पुलावरून जड वाहतूक सुद्धा होते. त्यामुळे अपघात होण्याच्या अगोदर पुल दुरुस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होतीये.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चंदनचा रस्त्यावर ओठ प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
चार ते पाच किलोमीटर पर्यंत या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तारेवरची कसरत करत वाहन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नुकताच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे मात्र मराठी सणांकडे आयुक्त दुर्लक्ष करत आहेत मुंबई पेक्षा गावाकडचे रस्ते बरे असा आरोप नागरिकांनी केला आहे
पंढरपूर मध्ये पूरस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे भीमा नदीची पाणी पातळी ही दर तासाला 4000 क्युसेक पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये पाणी शिरू सुरू लागले आहे. दुपारपर्यंत पंढरपूर मध्ये एक लाख 80 हजार क्युसेक पाणी येऊ शकतं त्यामुळे प्रशासनांन सतर्कतेचा इशारा दिलाय नगरपालिकेने जवळपास 100 कुटुंबांचं आता स्थलांतर केलेला आहे आणि गरज पडली तर आणखी कुटुंबाचे स्थलांतर करावं लागणार आहे पंढरपूरच्या ग्रामीण भागात सुद्धा महसूल प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेल्या काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केले आहे.
सांगलीच्या कृष्णची पातळी 42 फुटांवर पोचली आहे इशारा पातळी ओलांडल्याने सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर सांगलीच्या ईदगाह मैदान परिसरात सुद्धा पाणी आले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने काही प्रमाणात सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव ग्रामीण भागातील शिक्षणाचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमालीची कमी होत चालली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगलीच घटली आहे. जळगाव जिल्ह्यातील ७ जि.प. शाळा दुसऱ्या शाळेत समाविष्ट केल्या आहेत तर २४ शाळा बंद पडल्या आहेत. त्यातच विना अनुदानित ५५ शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे पटसंख्येतील घसरण अशीच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षात बहुतांश शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.ग्रामीण भागातील कमी होणारी लोकसंख्या, खासगी शाळांचा वाढता प्रभाव, शहरांकडे होणारे स्थलांतर, गावातील सुविधांचा अभाव अशा विविध कारणांमुळे जि.प. शाळांची पटसंख्या घसरत आहे. पूर्वी एका घरातून दोन किंवा तीन मुले शाळेत जाणारी होती पण, आता मात्र सीबीएसई शाळांकडे कल वाढला आहे. ५५ स्वयं अर्थसहाय्यित शाळाही विद्यार्थी येत नसल्याने बंद पडल्या आहेत.
वसंत विहार हायस्कूलजवळ रस्त्यावर पार्क केलेल्या MH04 JV 6539 वाहनाला अचानक आग लागली. गाडीला मोठा नुकसान झाल्याची नोंद आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी तातडीने कुलिंग ऑपरेशन करून आग नियंत्रणात आणली. प्राथमिक माहिती नुसार, शॉक सर्किटमुळे आग लागल्याचे अनुमान आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कृष्णेची पातळी ही 42 फुटावर गेली आहे. इशारा पातळी 40 ओलांडली आहे. धोका पातळी कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.
पुण्यातील वाघोली भागातील तांबे वस्तीत गुन्हे शाखेने कारवाई करत ७६ लाख रुपये किमतीचा एम डी ड्रग्स जप्त करत २ तरुणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघोलीच्या तांबे वस्ती मोठी कारवाई केली. राजस्थान राज्यातून आलेल्या रामेश्वरलाल मोतीजी अहिर आणि नक्षत्र हेमराज अहिर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३५१ ग्राम MD (मेफेड्रॉन) जप्त केले करण्यात आले असून बाजारभावानुसार त्याची किंमत ७६ लाख इतकी आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान झाल्याच चित्र असतांना वाशिमच्या कृष्णा गावच्या शेत शिवारात कपाशीच उभ पीक धोक्यात आलंय... अतिपावसामुळे कपाशीचे उभं पीक वाळायला सुरवात झालीय.. साहेबराव राठोड यांच्या असलेल्या एक एकर शेतातील कपाशी पावसात वाहून गेली तर उर्वरित कपाशीची मूळ कुजल्याने झाड वाळू लागली आहेत. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यावर मोठ्या संकट ओढावल असून, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
लातूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या 16 महसूल मंडळाला अतीवृष्टीचा फटका बसलाय. लातूरच्या अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक कपाशीची लागवड करण्यात येते, मात्र यंदा अतिवृष्टीमुळे कपाशीला पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यातील खंडाळी, शेणकुड ,ढाळेगाव, याशिवारातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर तालुक्यातून वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर रागाने नदीकाठच्या शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने, शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झाले आहे. तर शेतकरी आता सरकारच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करतोय.
धाराशिव जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून झालेल्या सततच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,ऊस आणि इतर पिकासह पालेभाज्यांचंही मोठं नुकसान झालंय.शेतकऱ्यांनी पेरलेली मेथी, कोथिंबीर,शेपूच्या शेतात पाणी लागल्याने पालेभाज्या जागीच सडुन गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.धारशिव तालुक्यातील रुईभर येथील शेतकरी किशोर कोळगे यांच्या एक एकरवरील मेथी भाजीच मोठ नुकसान झालय त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे २६ पैकी सात धरणे काठोकाठ भरली
मुळशी, मावळ व भोर तालुक्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली
विसापूर धरण ९९.३९ टक्के, पवना ९९.१५ टक्के, नीरा-देवघर ९७.८५ टक्के भरले आहे. माणिकडोहमध्ये मात्र फक्त ४४.१५ टक्के, तर येडगाव धरणात ७० टक्के पाणीसाठा आहे
चिल्हेवाडी ७७ टक्के आणि गुंजवणी ८१ टक्के भरली आहेत
इतर सर्व धरणांत ९० टक्क्यांहून अधिक साठा असून, शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याला दिलासा मिळाला आहे
मालखेड येथील एका खाजगी कंपनीमध्ये बिबट्याचा वावर
कंपनीच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसताच, कर्मचाऱ्यांनी मोबाईल कॅमेरात बिबट्याचा काढला व्हिडीओ
पाऊस सुरू असल्यानं कंपाउंड वॉलजवळ, झाडाच्या जवळ बसला होता बिबट्या
परिसरातील नागरी वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्यानं आणि पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले वाढल्यानं नागरिकांच्यात भीतीचं वातावरण
अनुचित घटना टाळण्यासाठी वनविभागाने, या परिसराची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी
धरण साखळी क्षेत्रात पावसाच्या विश्रांतीमुळे पानशेत धरणातून विसर्ग केला कमी
पुण्यातील ४ ही धरणात मुबलक पाणीसाठा
पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर मिळून २८.१६ टी एम सी पाणीसाठा
गेल्या वर्षी याच तारखेला इतकाच पाणीसाठ्याची होती नोंद
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)
खडकवासला: ८९.८४ टक्के
पानशेत: ९५.५९ टक्के
वरसगाव: ९७.५३ टक्के
टेमघर: १०० टक्के
चार ही धरणे मिळून एकूण पाणीसाठा: ९६.६१ टक्के
आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातुन गणेश मुर्तींच्या खड्डयांने भरलेल्या मुंबई गोवा मार्गावरून प्रवासाची. गणेशोत्सव आता आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्तांचा कोकणचा प्रवास सुरु होण्या आधी गणेशमुर्तींचा कोकण प्रवास सुरु झालाय. गणेश भक्तांप्रमाणेच खड्डयांनी भरलेल्या या मुंबई गोवा महामार्गावरून गणेश मुर्तींचा प्रवास सुरु झाला आहे. खड्डयांचे विघ्न पार करत सुरक्षितपणे गणेश मुर्ती नेताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका तासाच्या प्रवासासाठी तब्बल पाच - सहा तासा जात असल्याची खंत वाहन चालकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील वन क्षेत्रातून हजारो ब्रास मुरुमाचे राजरोसपणे बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू आहे. या प्रकरणी कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मागणी केली जात आहे.
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अजित पवार हे वर्धेत सकाळी साडे सात वाजता पोहचणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहे. त्यानंतर हिंगणघाट येथे माजी आमदार राजू तिमांडे यांचा पक्ष प्रवेश सुद्धा होणार आहे. सकाळपासूनच कामाची सुरवात करणारे मंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आहे.त्याच पद्धतीने ते वर्धेत येणार असून सकाळी आठ वाजताच अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. अजित पवारंच्या बैठकीच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे.
अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली. याआधीचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली झाल्याने मिना यांची अकोला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीय. मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभागप्रमुखांची ओळख करुन घेतलीय. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केलीय. जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत, जिल्हा नियोजनभवन, उपाहारगृह, अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केलीय. यावेळी यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेय.
अकोल्याचे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू जवळ ही घटना घडली. अकोल्याहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला एका अज्ञात वाहन धडक दिली होती, यामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर स्वरूपात जखमी झाले. स्थानिक नागरिकाच्या मदतीने तातडीने दोघांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात ॲम्बुलन्सद्वारे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.
भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी अकोल्यातील मुर्तिजापूर सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली. यादरम्यान, रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आलाय.. रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करताना औषध भंडार, आहार विभाग आणि प्रत्येक वार्डमधील रुग्णांची सुविधा देखील तपासल्या. तर काही कर्मचारी रजिस्टरवर सही करून गैरहजर असल्याचे आमदार पिंपळे यांच्या निदर्शनास आले. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करून, संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करत 15 दिवसांचे मानधन कपात करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, रुग्णालयामध्ये येणार्या प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी, योग्य सुविधा मि
भीमा खोर्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्यात आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणार्या विसर्गात मोठी वाढ केली आहे. आज पहाटे पासून 1 लाख 30 हजार क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आला आहे. भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सकाळी 6 वाजता कृष्णेची पातळी ही 42 फुटावर गेली आहे. इशारा पातळी ओलांडली आहे. धोका पातळी कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सांगली शहरातील सखल भागामध्ये पाणी आलेला आहे. मगरमच्छ कॉलनी, सुरवंशी प्लॉट,मिरज कृष्णा घाट कुरने वस्ती या ठिकाणी पाणी आल्याने येथील नागरिक स्थलांतर होत आहेत. आतापर्यंत 150 च्या जवळपास कुटुंब स्थलांतरित झाले आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतर होत आहेत. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. हळूहळू पाणी वाढत आहेत. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने कोकणात मोर्चेबांधणाला सुरुवात केलीय चिपळूणमधून प्रशांत यादव तर सिंधुदूर्गमधील युवा नेतृव विशाल परब यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश झालाय. आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत देखील भाजच्या काही नेत्यांनी दिलेत त्यामुळे कोकणात भाजप वाढवण्यासाठी हे दोन्ही जिल्ह्यातील पक्ष प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत विशाल परब यांनी पक्षाशी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर पक्ष कारवाई देखील झाली होती मात्र पुन्हा ते स्वगृही परतलेत रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच जोरदार स्वागत देखील करण्यात आलय.
अंबरनाथमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्यावतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रम मंगळवारी महिलांच्या तुफान गर्दीत पार पडला. ग्लोब हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यापूर्वी अंबरनाथ पूर्वेत मोठ्या गर्दीत मंगळागौर कार्यक्रम पार पडला होता. यानंतर आता अंबरनाथ पश्चिमेत उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून भव्य मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे खेळ, नृत्य सादर केली. मीना वाळेकर यांच्या सून प्रणाली वाळेकर यांनी सासू सुनेच्या नात्याचे भावनिक क्षण उलगडणारं हृदयस्पर्शी नृत्य सादर केलं, जे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. या कार्यक्रमाचं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कौतुक केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.