Maharashtra Live News Update: अजित पवार अपघात प्रकरण : ब्लॅक बॉक्स'मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

अजित पवार अपघात प्रकरण : ब्लॅक बॉक्स'मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

अजित पवारांच्या अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट

विमानातील "ब्लॅक बॉक्स" मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

"ब्लॅक बॉक्स" मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

"डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार

या अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार

पुणे शहराची गुरवारी बत्ती होणार गुल

पुणे शहराची बत्ती होणार गुल

उद्या सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत पुणे शहरातील बहुतांश परिसरात वीजपुरवठा राहणार बंद

पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील काही परिसरात वीज पुरवठा उद्या राहणार बंद

वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा राहणार बंद

महावितरण विभागाकडून निवेदन प्रसिद्ध

मंत्री गुलाबराव पाटलांना क्लिअरनेस मिळत नसल्याने उड्डाण रद्द

मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानाला लातूर मध्ये क्लिअरनेस नसल्यामुळे अचानक बाय कार जावे लागेल छत्रपती संभाजी नगर कडे.. विमानाने घेतले दोन वेळेस उड्डाण ,मात्र क्लिअरनेस मिळत नसल्याने उड्डाण रद्द.

क्लियरन्स नसल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचं हवाई उड्डाण रद्द... रस्ते मार्गाने संभाजीनगर कडे रवाना

एव्हिएशन कंपनीचे सहा आसन क्षमतेचं विमान

हैदराबाद ,बिदर आणि चेन्नई या ठिकाणावरून क्लिअरन्स आला नसल्यामुळे लातूर विमानतळावरून उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे लातूर विमानतळावरून साडेचार च्या दरम्यान उड्डाण करणार होते

म्हाडाने १२० सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली

म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील १२० सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली

५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणी स्थगित

म्हाडाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे निर्णय

सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका ५ फेब्रुवारीला अपलोड होणार नाही

३ फेब्रुवारी रोजी विविध वर्तमानपत्रांत योजना जाहीर करण्यात आली होती

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानी आज पहिल्यांदा शरद पवार आले आहेत...

शरद पवारांसह पूर्ण पवार कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज मोठ्या संख्येने बारामतीसह राज्यभरातून अनेक लोक सांत्वनपर भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आलेत..

या सर्व लोकांची भेट शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार,तसेच कुटुंबातील सगळे सदस्य घेत आहेत..

सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची भेट घेत आहेत...

एक्सप्रेस वे बंद केल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी, तिकीट खिडक्यांवर लागलेला लांबच लांब रांगा

एक्सप्रेस वे बंद झाल्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, पुण्याहून सर्वाधिक एसटीच्या गाड्या मुंबईला पुणे स्टेशन बस स्टॅन्ड येथून जातात. पुणे स्टेशन एसटी बस स्टँड येथून रोज 60 फेऱ्या होतात, त्या सर्व 60 फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी बॅगा घेऊन पुन्हा परतत आहेत,

शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

रायगड ब्रेकिंग : अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रन्सफर करण्याचे काम सुरु

रायगड ब्रेकिंग :

० अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रन्सफर करण्याचे काम सुरु

० अपघातग्रस्त टँकरमध्ये 27 टन प्रोपेन गॅस असल्याची प्राथमिक माहिती

० सदर टँकर कोचीन येथुन गुजरात येथील दहेज येथे जात असताना झाला अपघात

० मंगळवारी संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकर झाला आहे अपघातग्रस्त

दिवे घाटातील वाहतूक गुरुवारी ३ तास बंद राहणार

गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे

त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आवाहन

गोरेगावमध्ये लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसचे फुगे, मोठा अपघात टळला

गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो

नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पवार कुटुंबीय तिसऱ्या दिवशी सांत्वन भेट स्वीकारण्यासाठी सहयोग निवासस्थानी उपस्थित असतील

वेळ- 5 ते 7

शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू होती

वाहतूक कोंडी अजूनही कायम असल्याने एस टी प्रशासनाचा निर्णय

मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द

मंत्री गोगावले यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यावर सुनील तटकरे यांच्या विधानावर सूचक विधान

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण अशी चर्चा असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत अनवधानाने त्यांच्या तोंडून पटेलांचे नाव समोर आले यावरून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांना टोला लगावत पूर्व कल्पी ठरलेले असताना अस अनवधानाने कसं नाव येतं अस म्हणत फटकारल आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल

आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:

१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)

२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)

कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.

काय पाणी मुरतय ते बघाव लागेल; अजितदादांच्या अपघात प्रकरणी गोगावलेंनी व्यक्त केला संशय

अजितदादांच्या अपघाती मृत्युनंतर झालेल्या अपघाता बाबत राजकिय वर्तुळ आणि समाज माध्यमांवर संशय व्यक्त होत असताना मंत्री भरत गोगावले यांनी या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संशय व्यक्त केला आहे. काय गौडबंगाल आहे समजत नाही, अपघात सरळ दिसतोय, शरद पवारांनी घातपात नसून अपघात असल्याच मान्य केल. पण त्यांचीच माणस संशय घ्यायला लागली तर काय पाणी मुरतय ते पहावे लागेल अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली आहे.

अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलसाठी जागा मंजूर

  • अलियाबाद येथील ११.२९ हेक्टर जागेचा ताबा वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास प्रदान

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा निर्णय

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

  • १०० विद्यार्थी प्क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय उभारणार

  • महसूल विभागाचा निर्णय जारी

बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र

बार्शीतील वैरागमध्ये होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील बॅनर वरून उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि मशाल चिन्ह झाले गायब

बार्शी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निवडणूक लढवली जात आहे.

बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरोधात सर्वपक्षीय महाआघाडी उतरली आहे मैदानात

त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

चार चाकी वाहन चोरून त्याचे पार्टस वेगवगेळी करून विकणाऱ्या चोरट्यांना काळेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चार चाकी वाहन चोरून त्याचे पार्टस वेगवगेळी करून विकणाऱ्या चोरट्यांना काळेवाडी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या चोरट्यांच्या माध्यमातून काळेवाडी पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ठाणे महापालिकेत विरोधी बाकावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचे सूचक वक्तव्य , दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नजीब मुल्ला महापालिकेत विरोधी पक्षनेते

एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हे जरी अनुत्तरित असले तरी ठाणे महापालिकेत वेगळं चित्र दिसण्याची शक्यता

मनोज प्रधान यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत..

उल्हासनगर मध्ये महिलांच्या टोळक्यांकडून जीन्स कारखान्यात चोरी

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मधील चिराग हॉटेल जवळ जीन्स कारखाना आहे या जीन्स कारखाना मध्ये महिलांचे टोळकं हे खरेदीच्या बहाण्याने या कारखान्यात आल्या त्या जीन्स पॅन्ट बघत असतानाच तब्बल दहा जीन्स चोरी करून ते पसार झाले या चोरीची संपूर्ण घटना कारखान्यात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकचा तिढा सुटला

बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवक पदाचा तिढा अखेर सुटलाय. भाजपचे प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय. भाजपचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होतं. त्यांच्या जागी प्रवीण राऊत यांची वर्णी लागलीये. प्रवीण राऊत हे यापूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते.

अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडून अलीकडेच भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपकडून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालीये. स्वीकृत नगरसेवकपदाची घोषणा होताच राऊत समर्थकांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

नाशिक एमआयडीसीमध्ये भीषण आग

- सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीमधील मोहदरी वन उद्यान जवळील विमा ॲरोमॅटिक्स या कंपनीला भीषण आग

- माळेगाव एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे

- बंदोबस्तासाठी सोमठाणे येथे गेलेले सिन्नर अग्निशमन दल थोड्याच वेळात पोहोचणार

- नाशिकचे महापालिका अग्निशमन दल थोड्याच वेळात दाखल होणार

- सिन्नरच्या वॉटर टँकर धारकांना घटनास्थळी पोहोचण्याचे आवाहन

कोल्हापूरमध्ये 6 फेब्रुवारीला महापौर -उपमहापौर पदाची होणार निवड

६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगर पालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस ठरणार असून, नवनिर्वाचित ८१ नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. तसेच सहा तारखेलाच नूतन महापौर आणि उपमहापौरांची निवड देखील होणार आहे. या पहिल्याच सभागृह बैठकीला विशेष महत्त्व असल्याने महापालिकेतील शाहू सभागृहाची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू करण्यात आली असून ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आलेली आहे. महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि कोल्हापूर पोलिसांकडून देखील या सभागृहाची पाहणी करण्यात आली आहे. सभागृहातील बैठक व्यवस्था, विद्युत प्रणाली, स्वच्छता, रंगरंगोटी तसेच आवश्यक तांत्रिक सुविधांवर भर देण्यात येत असून, पहिलं सभागृह व्यवस्थित पार पडावे यासाठी प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे.

पंढरपुरात खत दुकानाला आग

पंढरपूर शहरातील एका रासायनिक खत विक्री दुकानाला आज सकाळी अचानक मोठी आग लागली आहे. आगीमध्ये लाखो रुपयांचे रासायनिक खत व इतर साहित्य जळून खाक झाले आहे.

आगीचे लोडषआणि धुराच्या लोटामुळे पंढरपूर शहरांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. सुमारे अर्ध्या तासांपासून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अजून आग आटोक्यात आली नाही.

सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार युती

भाजपाकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आली धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा

तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार

आज दाखल करणार उमेदवारी अर्ज दाखल,10 फेब्रुवारी रोजी होणार आहे निवडणूक.

शिंदे शिवसेनेला देखील सोबत घेणार.

महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत अजित पवारांसोबत निधनाच्या आधी चर्चा झाली होती.

राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे अस्थिकलश दर्शनासाठी; थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांच्यासह आमदारांची असणार उपस्थिती

बीडच्या राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थिकलश कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. थोड्याच वेळात आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांच्यासह माजी आमदारांची दर्शनासाठी उपस्थिती असणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत राष्ट्रवादी कार्यालयात हे अस्थिकलश ठेवले जात असून चार वाजता गोदावरी नदीकाठच्या राक्षस भवन येथील शनी मंदिर गोदावरी नदीत अस्थि विसर्जन केले जाणार आहे.

Khed अस्थिकलश रथ गावोगाव फिरताना दादांच्या आठवणींनी महिलांच्या डोळ्यांत अश्रू दादा गेले तरी त्यांचं काम आमच्यात जिवंत आहे

उत्तर पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या अस्थिकलश रथाचे दर्शन घेण्यासाठी रथ गावोगाव फिरत असताना ग्रामीण भागात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. दादांच्या आठवणीत अनेक महिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिराने

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

उशिराने धावणाऱ्या लोकलबाबत पश्चिम रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, बोरघाट गॅस टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प

मुंबई पुणे आणि पुणे मुंबई येथे आज रोजी ट्रॅफिक राहणार

प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरावा

चांदणी चौक ते घाट रायगड मार्गे मुंबई

आळे फाटा माळशेज घाट ठाणे मार्गे मुंबई

महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राकडून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे अवाहन

तुळापूर येथे अजितदादांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन

छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र तुळापूर येथे इंद्रायणी–भामा–भीमा या पवित्र नद्यांच्या संगमावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात आले.

या धार्मिक विधीला पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण विधी अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला. उपस्थित भाविकांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. ऐतिहासिक आणि पवित्र अशा या स्थळी झालेल्या विसर्जनामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरु

शरद पवार विद्या प्रतिष्ठान मध्ये दाखल

पार्थ पवार देखील विद्या प्रतिष्ठान मध्ये

विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये शरद पवार आणि पार्थ आणि जय पवार उपस्थित

शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरु

 Buldhana: बुलढाण्यात स्वच्छ भारत व जलजीवन मिशन ठप्प होण्याच्या मार्गावर...

बुलढाणा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जलजीवन मिशनअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महिनोन्‌महिने मानधन थकले आहे..... जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना २३ डिसेंबर २०२५ पासून मानधनच अदा करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर् उपासमारीची पाळी आली आहे .. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बऱ्याच वेळा लेखी निवेदन देण्यात आले आहे.. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे..त्याविरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.. मानधन न मिळाल्यास राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे...याचा थेट परिणाम स्वच्छता, पाणीपुरवठा व ग्रामस्तरीय कामकाजावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आता प्रश्न असा आहे की, प्रशासन वेळेत दखल घेणार का, की स्वच्छ भारत मिशनच ठप्प होणार?

Nanded: नांदेडमध्ये स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थीकलशाचे विसर्जन

विमान अपघातात मृत्यू पावलेल्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे नांदेड मध्ये विसर्जन करण्यात आले. काळेश्वर येथील गोदावरी नदीत मंगळवारी रात्री उशिरा अस्थीचे विसर्जन करण्यात आले.दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दर्शनासाठी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सह राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.

बुलढाण्यात धक्कादायक घटना!  ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे... येथे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

घटनेनंतर आरोपी मुलीला घेऊन मलकापूर रेल्वे स्थानकात गेल्याची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला अटक केली असून पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले आहे...मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Gokul: 'गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून त्याची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, दहा फेब्रुवारीनंतर कधीही निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून काही प्रमाणात मोकळे होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष ‘गोकुळ’च्या निवडणुकीकडे वळणार आहे.

पुढील आठवड्यात विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कार्यालया कडून ‘गोकुळ’ला मतदार यादी मागणीचे पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. यानंतर ‘गोकुळ’कडून सभासदांची यादी प्रशासनाकडे सादर केली जाईल. ही यादी अद्ययावत करून, संस्थांच्या ठरावासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्या नंतरच ‘गोकुळ’च्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार असून, तेथून पुढे खऱ्या अर्थाने ‘गोकुळ’च्या निवडणुकीची लगीनघाई सुरू होणार आहे. सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकणारी ही निवडणूक असल्याने, आगामी काळात ‘गोकुळ’च्या राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Nashik: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती

प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती

महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची झाली आहे निवड

महापौर ,उपमहापौर नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर

तसेच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील दिला होता प्रस्ताव

याच प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते

याच सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदार यांनी प्रदेश कामिटीला पाठवला आपला पदाचा राजीनामा

नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज करण्याची देखील सुनील केदारे दिली माहिती

Sawantwadi: कास गावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

सावंतवाडी तालुक्यातील कास गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ​गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या गावात आणि लगतच्या शेतशिवारात सातत्याने दिसून येत होता. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये, विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना मोठी दहशत निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवरही या बीबट्याने हल्ले केले होते. अखेर या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. बिबट्या पकडला गेल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे कास गावातील नागरिकांवरील मोठे संकट टळले आहे.

Mahashivratri: महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन राहणार बंद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी आणि प्रोटोकॉल दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले आणि सचिव राहुल सुभाषचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीच्या काळात भाविकांची गर्दी कैक पटीने वाढते. या गर्दीमुळे प्रशासनावर येणारा ताण आणि निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सर्वसामान्य भाविकांना सुलभरीत्या दर्शन मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये ४३९ कोटी थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा अल्टीमेटम

४३९ कोटी थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा अल्टीमेटम

२४ तासासाठी थकबाकीदार शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा होणार खंडित

वारंवार सूचना, स्मरणपत्रे, पत्यक्ष पाठपुरावा, नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देऊ नये ग्राहकांनी केला दुर्लक्ष

वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील १६ हजार ९८१ शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा येत्या १२ तारीखेला तब्बल २४ तासासाठी खंडित करण्यात येणार आहे.

२४ तास वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई

कोट्यावधीची थकबाकी असल्याने परिमंडळातील

शासकीय व सार्वजनिक सेवा देणाऱ्या कार्यालयांविरूध्द महावितरणने कठोर भुमिका घेतली असून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय कार्यालयांचे येत्या १२ तारखेला तब्बल २४ तासासाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ३ हजार ५३१ कार्यालयाकडे ५५ कोटी २० लाख रूपयाचे वीजबिले थकीत आहे.

Pune: राज्यात गारठा कमी, उकाडा जाणवायला सुरुवात

राज्यात गारठा कमी झाला असतानाच, उकाड्यात वाढ झाली आहे.राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार, तसेच उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण केरळपासून दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवर अपघात, टँकरमधील वायुगळती थांबवण्याचे काम सुरु

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला. 12 तास उलटून गेल्यानंतर देखील या गॅसची गळती थांबवण्या कामी प्रशासनाला यश आलेले नाही. अग्नीशमन दल, बचाव आणि मदत पथक, NDRF च्या टिम घटना स्थळी दाखल झाल्या आहेत पण केमिकल एक्सपर्ट टिम आली नसल्याने गॅस गळती थांबवण्याच्या कामी विलंब होत आहे. सुरक्षितता पाळून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी एकनाथ शिंदे घेणार जाहीर सभा

धाराशिव मधील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे होणार सभा

दुपारी बारा वाजता सभेला होणार सुरुवात

एकनाथ शिंदे यांच्यासह,पालकमंत्री प्रताप सरनाईक इतर शिवसेना नेते असणार सभेसाठी उपस्थित राहणार

Nagpur: महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे अनिवार्य

महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे अनिवार्य.

निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खर्चाची देयके, पावत्या,व्हाऊचर्स सादर करणे आवश्यक.

मात्र अनेक उमेदवारांनी अद्याप खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही.

वेळेत खर्च न सादर केल्यास पाच वर्षे निवडणूक अपात्रता लागू होऊ शकते.

त्यामुळे खर्च न सादर केलेल्या उमेदवारांनी १६ फेब्रुवारीपूर्वी झोननिहाय खर्च सनियंत्रण पथकाकडे हिशोब सादर करावा, असे महानगरपालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

धक्कादायक; सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती चालत्या कार ने घेतला पेट प्रवासी थोडक्यात बचावले

बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्ग वरती धावत्या वाहनाला भीषण आग लागली असून या कार ने मोठा पेट घेतला असून जाळाचे लोट पाहायला मिळत आहेत. बीड च्या लगत असलेल्या मांजरसुंबा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती प्रवाशाच्या कारला आग लागली असून गाडीने मोठा पेट घेतला आहे गाडी जळून खाक झाली असून अद्याप पर्यंत कारण अस्पष्ट असून प्रवासी थोडक्यात बचावले असून ते सुखरूप आहेत मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कारला नेमकी आकाशामुळे लागली त्याचबरोबर आगीचे कारण अद्याप पर्यंत समोर आले नसून याप्रकरणी स्थानिक पोलीस ग्रामीण ने घटनास्थळी धाव घेतली असून घटनेची चौकशी केली आहे.

खासदार निंबाळकरांच्या वक्तव्याचं सरनाईकांकडून कौतुक; उद्धव ठाकरे,संजय राऊत यांची कोंडी

ईव्हीएमला दोष देत बसू नका,घोटाळा असता तर मी खासदार झालो असतो का या ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केलं.सोबतच उद्धव ठाकरे आणि ईव्हीएमला दोष देणाऱ्या संजय राऊत यांना याबद्दल सांगा अस म्हणत प्रताप सरनाईक यांनी ईव्हीएम च्या मुद्द्यावरून ठाकरे राऊतांवर निशाणा साधला. भाजप आणि शिवसेनेने ईव्हीएममध्ये काहीतरी लफडं केलं हा वारंवार तुम्ही दोष देता निवडून आले की ईव्हीएम चांगलं पराभव झाला की ईव्हीएम मध्ये घोटाळा अशी भूमिका आम्ही घेतली नाही असे सरनाईक म्हणाले. ढोकी इथ जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी आल्यानंतर सरनाईक बोलत होते. ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांनी ईव्हीएम बद्दल जाहीर वक्तव्य करत घोटाळा गडबड होत नसल्याचं सांगितल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत कोंडीत सापडले.यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्यासही सरनाईक म्हणाले.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अध्यक्षपदावरून भाजप - शिवसेनेत जुंपली

धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार असा दावा माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी केलाय.धाराशिव मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असुन भाजपा पाठोपाठ आता शिवसेना देखील अध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. आम्ही फक्त अपेक्षा करत नाही तर कृतीतून दाखवतो त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल धनुष्यबाणाचाच असेल असा दावा तानाजी सावंत यांनी वाशी तालुक्यातील पारा येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेतुन केला आहे.त्यामुळे अध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेत जुंपली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com