Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टी मंगळवारी नागपूरमध्ये आंदोलन करणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आजच्या ताज्या बातम्या, राज्यात मान्सून सक्रीय, अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

कॉकरोच जनता पार्टी मंगळवारी नागपूरमध्ये आंदोलन करणार

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने येत्या मंगळवारी (ता. १६ जून) नागपूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे नागपूरमधील आंदोलनात सहभागी होणार आहे.

उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आम्ही सोलापूर विधानपरिषद निवडणूकित भाजपसोबत आहोत...आमच्याकडे संख्याबळ नसल्याने आणि टोकाची कटुता येऊ नये म्हणून मी महायुतीला पाठिंबा दिला आहे ... मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही ही भूमिका घेतली का? या प्रश्नाला उत्तर देताना तो शो झाला आहे असं सांगत या प्रश्नाला बगल दिली. मतदार संघात निधीची गरज लागते त्यामुळे मी भेट घेतली आहे.

विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नाही: खासदार धैर्यशील मोहिते पाटील

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या विरोधी करण्याची चर्चा नाही. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीतही विलीनीकरणाबाबत चा विषय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फेसबुक-इन्स्टाग्राम सेवा ठप्प

मेटाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवेत शुक्रवारी अचानक अडथळे निर्माण झाल्याने जगभरातील हजारो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना लॉग-इन, फीड रिफ्रेश, मेसेज पाठवणे आणि अॅप वापरण्यात समस्या आल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. सोशल मीडिया आणि आउटेज ट्रॅकिंग संकेतस्थळांवर तक्रारींचा भडिमार झाला. या तांत्रिक बिघाडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मेटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.

मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरण; डॉ. किशोर डांगेसह ९ आरोपींना पुन्हा ५ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिकच्या मालेगावातील अल्पवयीन बालिकेच्या प्रसूती आणि नवजात बालक विक्री प्रकरणात माजी शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्यासह ९ आरोपींना न्यायालयाने १७ जूनपर्यंत पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल असून तपासाची व्याप्ती वाढत असल्याने आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलगी आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी आणि शिरपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा आधार मिळाला असून खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

यवतमाळमध्ये वीज कोसळून मेंढपाळासह 13 बकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील टाकळी परिसरात वीज कोसळून मेंढपाळ विलास तुमराम यांच्यासह 13 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विलास तुमराम हे बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना अचानक पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याचदरम्यान वीज कोसळल्याने त्यांचा आणि कळपातील 13 बकऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तुमराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनमाड-लासलगाव रस्त्यावर इंधन भरून जात असलेल्या टँकरचा अपघात

मनमाड-लासलगाव रस्त्यावरील भारत नगर परिसरात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात होऊन तो पलटी झाला. पुढे जाण्याच्या प्रयत्नात अपेरिक्षा आणि टँकर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. लासलगावच्या दिशेने इंधन घेऊन जाणारा टँकर रस्त्यावर उलटल्यानंतर इंधन गळती सुरू झाली. खबरदारी म्हणून स्थानिक नागरिकांना अपघातस्थळापासून दूर ठेवण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील चंद्रकांत भुसारा यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे विक्रमगड,जव्हार,मोखाडा तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत असलेली जाण आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत भुसारा यांची संचालकपदी निवड झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या माध्यमातून बँकेच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि सहकारी संस्थांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Saam Impact:  चिखला-काकड येथील शिवाजी महाराज स्मारकासाठीचे आमरण उपोषण स्थगित..

लोणार तालुक्यातील चिखला-काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. साम टीव्हीने उपोषणाची बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत आंदोलकांशी चर्चा केली. पुढील 3 ते 4 दिवसांत संबंधित विभागांची बैठक घेऊन स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करण्याचे तसेच 8 ते 10 दिवसांत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. यावेळी आमदार मनोज कायंदे, एसडीएम जोगी, डीवायएसपी संतोष खाडे, तहसीलदार भुषण पाटील यांच्यासह विविध अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी

शहरातील काही भागात पावसाच्या सरी... वातावरणात गारवा, शहरातील काही भागात तुरळक पाऊस..

जून महिना लागूनही तापमान हे 44 अंशाचा घरात आहे. यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस आणखी तपमान असेच राहणार असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे..

मात्र आज अचानक वातावरणात गारवा निर्माण होत, विजांचा कडकडाटसह पावसाचा सरी कोसळल्यात.

हा पाऊस सर्वदूर नसून शहरातील काही काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे...

लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याणचा निधी वळवला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे 344 कोटी रुपये शासन निर्णयाच्या माध्यमातून लुबाडण्यात आले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला निधी वळवण्यात आला असून समाज कल्याण विभागाच्या योजना कशा चालतील याचे नियोजन न करता फक्त लाडकी बहीण योजना कशी सुरू राहील हाच प्रयत्न सरकार करत असल्याची टीका वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केली आहे..

विरारच्या पारोल-अंबाडी मार्गावर भीषण अपघात

विरारच्या पारोल-अंबाडी मार्गावर आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुचाकी आणि हायवा ट्रकचा भीषण अपघात

या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

रवींद्र पाटील (वय ५४) असे मृतू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते पारोल येथे राहणारे होते

पाटील पारोल येथून विरारच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हायवा वाहनाच्या धडकेत अपघात झाला.

हायवा चालकाला वळण घेत असताना दुचाकी दिसली नसल्याने वाहनाखाली चिरडली गेली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

यवतमाळ: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक

यवतमाळ लगतच्या भोयर गावात सचिन शिंदे यांच्या घराला अचानक आग लागून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत घरातील साहित्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

पुण्यातील हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात पोलिसांचे छापे

कॉल सेंटर चालवुन लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास भाग पाडून त्यांच्याकडून उकळत होते पैसे

दररोज ३०० ते ४०० जणांची लाखो रुपयांची फसवणूक

या कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या सर्व जणांवर गुन्हे दाखल

जालन्यात राजुर गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणींवर काळाचा घाला

भरधाव हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू;जालन्याच्या गुंडेवाडी शिवारात घडला भीषण अपघात.

हायवा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात बसली स्कुटीला धडक

महाविद्यालयीन तरुणी राजुर गणपतीच्या दर्शनाला जात असताना घडली घटना,एक तरुणी जागीच ठार,तर 2 गंभीर जखमी

जालन्यातील परतूरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोष ट्रॅक्टर मोर्चा,फसवी कर्जमाफीविरोधात काँग्रेसचा एल्गार

जालन्यातल्या परतूरमध्ये काँग्रेसच्या वतीने जनआक्रोष ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकर्यांनी सहभाग घेतला.. राज्य सरकारने शेतकर्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केलीये.मात्र ही कर्जमाफी फसवू असून शेतकर्यांना याचा लाभ मिळणार नाही.. त्यामुळं परतूरमध्ये काँग्रेसने राज्य सरकार विरोधात जनआक्रोष ट्रॅक्टर मोर्चा काढला.

पुण्यातील विविध विषयांवर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात बैठक

जळगाव मध्ये शिवसेनेच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीची तातडीची बैठक

शिवसेना शिंदे गटाकडून झालेल्या बंडखोरी संदर्भात बैठकीत चर्चा मात्र बंडखोराच्या माघारी संदर्भातला तिढा कायम

कुठलाही तिढा नसल्याचा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्टीकरण गुलाबराव पाटील उद्या जळगावत आल्यानंतर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महावीर युतीच्या उमेदवाराला पाठिंबा संदर्भात निर्णय घेऊ अशी आमदार किशोर पाटलांची माहिती

बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत, बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

बदलापूरमध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आलीय. भरवस्तीत असलेल्या एका सोसायटीत हातात कोयता घेऊन काही जण संशयास्पदरित्या दिसून आले आहेत. या कोयता गँगचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. तर भर वस्तीत अशाप्रकारे गुन्हेगार बिनाधास्तपणे वावरत असताना बदलापूर पूर्व पोलीस नेमकं काय करतायेत असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतोय.

TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात

* TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात

* नाशिकरोड न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर सुनावणी सुरू

* मागील दोन तारखांना सुनावणी न झाल्याने आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत गॅस लिकेजची घटना

लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत गॅस लिकेजची घटना

नंदादीप केमिकल कंपनीत गॅस लिकेज

सुदैवाने कोणी जखमी नाही

अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल

बीडच्या माजलगाव शहरात पेट्रोल पंप चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

बीडच्या माजलगाव शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरणाऱ्या व्यक्तीवर काही तरुणांनी शुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला केला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या

प्रकरणात सचिन दत्तात्रय नरसाळे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दोघाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी हिंगोली जिल्ह्यातील सव्वा लाख हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

विदर्भ वगळता राज्यातील जिल्हा परिषद शाळासह खाजगी शाळा येत्या 15 जून पासून सुरु होणार आहेत.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्याचे उद्दिष्ट हिंगोलीच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आल आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अकराशेहुन अधिक जिल्हा परिषद नगर परिषद त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच तालुक्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप केले जाणार आहेत

१५ जूनपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांचा भिमाशंकर दौरा; विकास आराखडा व सुरक्षिततेची पाहणी


१५ जूनपासून श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिर मर्यादित स्वरूपात भाविकांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या भिमाशंकर दौऱ्यावर येत असून भिमाशंकर विकास आराखड्यातील कामे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा व भाविकांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी करणार आहेत.

Navi Mumbai : दीड तास लिफ्टमध्ये अडकलेल्या चार तरुणांची खारघर अग्निशमन दलाकडून थरारक सुटका

नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 34B येथील तुलिप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये चार तरुण अडकल्याची घटना घडली. सिडको अग्निशमन केंद्र, खारघर यांना याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत चारही जणांची सुरक्षित सुटका केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये तथ्य नाही - शशिकांत शिंदे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कालच झालेला असताना जाणून-बुजून ही चर्चा घडवली जात असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे.

भारत जगातील ४थी अर्थव्यवस्था - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगातील सार्वधिक दूध उत्पादन करणारा देश भारत - देवेंद्र फडणवीस

पगारवाढीसाठी चंद्रपुरात ईव्ही बसचालकांचे आंदोलन

कामाच्या तुलनेत मिळणारे अत्यंत कमी वेतन आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून चंद्रपूर आगारातील 'ग्रीन ई-मोबिलिटी एलएलपी' कंपनीच्या ईव्ही (EV) बसचालकांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपुरातील एसटी वर्कशॉप समोरील परिवहन कार्यालयाबाहेर चालकांनी ठिय्या मांडल्यामुळे शहरात एकही ईव्ही बस धावू शकलेली नाही. उन्हाळ्याच्या तीव्र चटक्यांमध्ये अचानक बस सेवा विस्कळीत झाल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ MIDCतील कंपनीत आढळला 4 फुटी अजगर,  सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसी परिसरातील एका इंजिनिअरिंग कंपनीत चार फुटी अजगर आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कंपनी प्रशासनाने तत्काळ सर्पमित्र प्रकाश गोहिल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र आकाश गोहिल यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराची सुरक्षित सुटका केली.

साताऱ्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार; भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला 

साताऱ्यातील वाई-पाचवड रस्त्यावर एका मद्यधुंद ट्रक चालकाने घातलेल्या धिंगाण्यामुळे भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाईकडून पाचवडच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले.आणि हा अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आत शिरला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीररी्या जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आजपासून रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन 

आमदार रोहित पवार पंढरपूर मध्ये दाखल....

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आजपासून रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन....

संत गाडगे महाराज मठातून रॅली काढत रोहित पवार जाणार आंदोलन स्थळी....

रोहित पवार यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी दाखल....

संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन करणार आंदोलनाला सुरुवात....

बदलापूरमध्ये मार्केट परिसरातील वाईन शॉपबाहेर सर्रास मद्यपान

बदलापूरमध्ये मार्केट परिसरातील वाईन शॉपबाहेर सर्रास मद्यपान

राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी विचारला मद्यपी आणि वाईन शॉप चालकाला जाब

वाईन शॉपबाहेरील कचऱ्याच्या डब्यात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही - संगीता चेंदवणकर यांचा इशारा

शहादा बर्हाणपूर महामार्गावर ट्रकचा स्फोट

अपघात होऊन ट्रक रस्त्याच्या कडेला पलटल्यानंतर स्फोट होऊन ट्रक आगीत जळून खाक

ट्रक मध्ये थिनर केमिकल असल्याची प्राथमिक माहिती

वाशिमच्या कारंजा शहरात'श्रीं'च्या चरणी 7 क्विंटल 25 किलो आंब्यांची आरास

वाशिमच्या कारंजा शहरातील ममतानगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात पुरुषोत्तम अधिक मासातील कमला एकादशीचे औचित्य साधत तब्बल 7 क्विंटल 25 किलो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली. यावेळी कानवल्याचा विशेष नैवेद्य अर्पण करण्यात आला. या अनोख्या धार्मिक उपक्रमामुळे शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकी एक किलो आंबे अर्पण करून सहभाग नोंदविला.

Maharashtra News Live Update: हार्बर मार्गावर लोकल रखडली, २० मिनिटांचा लेटमार्क

हार्बर मार्गावर लोकलला लेटमार्क लागला आहे. पनवेलहून सीएसएमटीकडे धावणारी लोकल २० मिनिटे उशिराने धावत आहे. गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्याने मुंबईकरांचा संताप अनावर झालाय.

चिखला काकडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वादाची ठिणगी; 350 ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू

लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात वादळ-वाऱ्यामुळे सध्याचा फायबरचा पुतळा कोसळून अनुचित घटना घडू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पुतळा सुरक्षित स्थळी कायमस्वरूपी बसविण्याच्या मागणीसाठी गावातील सुमारे 300 ते 350 महिला-पुरुष ग्रामस्थ गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.

15 ऑगस्ट पूर्वी भरत गोगावले पालकमंत्री होतील

विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडच पालकमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता रायगडच पालकमंत्री पद मंत्री भरत गोगावले यांना येत्या 25 ऑगस्ट अगोदरच मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. भरत गोगावले यांनी कोकणच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी जो काही निर्णय घेतलाय यावरून आमचा तो अधिकार आहे आणि याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील येत्या आठ दहा दिवसात निर्णय घेऊन आम्हाला न्याय देतील आणि भरत गोगावले यांच्या रूपात आम्हाला रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Maharashtra News Live Update: पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून सुमारे ७० टक्के करारनामे जमा झाले आहेत. त्यासाठी आता पर्यंत ९५० रुपयांचे वाटप झाले असून २००० कोटी रुपये पुढच्या आठवड्यात प्राप्त होतील. उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com