AI In Farming: AI मुळे ऊसशेतीत क्रांती; खर्च घटणार, उत्पादन वाढणार!

AI Use In Sugarcane Farming: भारत हा कृषीप्रधान देश आहेत. देशात शेतीवर विविध प्रयोग होत असतात. नुकतंच एका संशोधनातून हे समोर आले आहे की, एआयच्या वापरामुळे ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होऊ शकतो.
AI In Farming
AI In FarmingSaam Tv
Published On

जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरु असतानाच भारतात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊसशेतीचा प्रयोग करण्यात आलाय.. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊसशेतीत कोणते बदल होणार आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

AI मुळे ऊसशेतीत क्रांती (AI Use In Sugarcane Framing)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विविध क्षेत्रात डंका वाजत असताना आता एआयमुळे ऊस शेतीत क्रांतीकारी बदल होणार असल्याचं बारामतीतील संशोधनातून समोर आलंय. हा प्रकल्प बारामतीत शरदचंद्र पवार आधुनिक ऊसशेती विस्तार प्रकल्पांतर्गत राबवल्याची माहिती सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवारांनी दिलीय.. तर एआयमुळे देशभरातील उत्पन्न 45 हजार कोटींवर जाण्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय..

पारंपरिक शेतीत अपुऱ्या माहितीमुळे ऊसाचा उत्पादन खर्च वाढत असताना एकरी उत्पादनात मात्र घट होत असल्याचं चित्र आहे. मात्र बारामतीत AI चा वापर करून केलेल्या संशोधनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.. मात्र AI तंत्रज्ञानाचे ऊस शेतीसाठी कोणते फायदे आहेत? पाहूयात...

AI तंत्रज्ञानाचे फायदे?

ऊसाच्या उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ

35 टक्क्यांपर्यंत कापणी कार्यक्षमतेत सुधारणा

ऊस उत्पादनाच्या खर्चात 20-40 टक्के घट

25 टक्के रोगाच्या निरीक्षणामुळे औषधांच्या वापरात बचत

25 टक्के रासायनिक खतांच्या वापरात घट

मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदा (Farming With AI Tool)

AI In Farming
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्ज, जीआयएस, मशिन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 200 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात AI तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसंच हे संशोधन शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला कलाटणी देणारे ठरण्याची शक्यता आहे.

AI In Farming
Baramati Assembly Constituency: पवार विरुद्ध पवार लढाई, अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीमध्ये तगडी फाइट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com