Jio New Internet Plan : जिओचा डबल धमाका; वर्षभरासाठी फुकटात इंटरनेट मिळणार, अंबानींचा नेमका प्लान काय?

Jio New Offer: रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी खास दिवाळी गिफ्ट घेऊन आला आहे. नवीन ऑफर अंतर्गत युजर्सना १ वर्ष फ्री इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
Jio New Offer
Jio New Internet PlanSAAM TV
Published On

जिओ आपल्या युजर्सना कनेक्ट ठेवण्यासाठी नेहमीच नवनवीन उपाय योजना घेऊन येत असतं. ठराविक वेळेनंतर जिओ आपले अनेक रिचार्ज प्लान लाँच करत तर काही वेळा जुने प्लान नव्याने अपडेट करत राहत.

आतापण रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना आनंदाची बातमी दिली आहे. जिओने वापरकर्त्यांसाठी दिवाळीसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एक वर्ष मोफत जियो एयरफाइबर कनेक्शन मिळणार आहे. युजर्सना 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत हा लाभ घेता येणार आहे. तसेच हा फायदा सर्व जियो फाइबर आणि जियो एयरफाइबर चे वापरकर्ते करू शकतात.

नियम जाणून घ्या

जिओचे वापरकर्ते कोणत्याही रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून 20,000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतींच्या वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे. ही ऑफर 8 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर व्हॅलिड आहे. शॉपिंगवर मिळणाऱ्या कूपनवर तुम्हाला नोव्हेंबर ते ऑक्टोबर 2025 व्हॅलिडीटी मिळेल.

Jio New Offer
UPI Payment: आजपासून UPI देवाण-घेवाणची मर्यादा बदलली, जाणून घ्या एकावेळी किती पैसे पाठवता येणार?

नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या अटी आहेत. वापरकर्ते ऑक्टोबर 2025 पर्यंत कधीही कूपन रिडीम करू शकतात. कूपन वापरण्यासाठी तुम्हाला ते मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत 15,000 रुपये किंवा त्याहून अधिकची इलेक्ट्रॉनिक खरेदी करणे गरजेचे आहे. तुम्ही जर जिओचे जुने युजर्स असाल तर 2,222 रुपयांची दिवाळी ऑफर रिचार्ज करा. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत फ्री जियो एयरफाइबर सुविधा मिळेल. पात्र वापरकर्त्यांना त्यांच्या सक्रिय Jio AirFiber योजनेच्या मूल्याप्रमाणे 12 कूपन प्राप्त होतील. हे कूपन रिलायन्स डिजिटल, मायजिओ, जिओपॉइंट किंवा जिओमार्ट डिजिटल अनन्य स्टोअरमध्ये रिडीम केले जाऊ शकतात.

Jio New Offer
Jio Down : सिग्नल मिळेना, इंटरनेटही गेलं; जिओने उडवली ग्राहकांची झोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com