Bhakti Modi : ईशा अंबानीची मैत्रीण; रिलायन्स इंडस्ट्रीजची रायझिंग स्टार, कोण आहे भक्ती मोदी?

Who is Mukesh Ambani Friend Daughter Bhakti Modi : रिलायन्स इंडस्ट्रीजचा रायझिंग स्टार भक्ती मोदी सध्या खूपच चर्चेत आहे. आपण तिचा आणि अंबानी कुटुंबाचा काय संबंध आहे, ते जाणून घेवू या.
भक्ती मोदी
Bhakti Modi Saam Tv
Published On

मुंबई : अंबानींच्या उद्योग सुमहाशी संबंधित एक नाव समोर आलंय. रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्लॅटफॉर्म टियाराच्या सीईओ भक्ती मोदी यांचं नाव आहे. रिलायन्स रिटेल ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी. तिचे इक्विटी मूल्य सुमारे ८.४ लाख कोटी रुपये आहे. भक्ती मोदीला रिलायन्स इंडस्ट्रीजचा रायझिंग स्टार म्हटलं जातंय. सौंदर्य आणि फॅशनच्या क्षेत्रामध्ये रिलायन्सच्या मजबूत पकडीमध्ये भक्ती मोदीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांची अंदाजे एकूण संपत्ती ७६४८५, कोटी रुपये आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांची तिन्ही मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी देखील कौटुंबिक व्यवसाय पुढे नेत (Who is Mukesh Ambani Friend Daughter) आहेत. त्यांची मुलगी ईशा जवळपास दशकभरापासून 'रिलायन्स रिटेल'शी संलग्न आहे. ईशाच्या आतापर्यंतच्या प्रवासात भक्ती मोदीच्या रूपात एक मास्टरमाइंड मिळालाय. भक्ती तिची सर्वात विश्वासू सहकारी आहे. ईशा अंबानीचा उजवा हात असेलल्या भक्ती मोदीबद्दल आपण जाणून घेवू या.

कोण आहे भक्ती मोदी?

भक्ती मोदी ही मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे सहकारी मनोज मोदी यांची मुलगी (Tira CEO) आहे. काही महिन्यांपूर्वी भक्ती रिलायन्स रिटेलच्या ब्युटी प्लॅटफॉर्म टियाराची सीईओ बनली. ३३ वर्षांची भक्ती मोदीने ईशा अंबानीसोबत काम करतेय. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक मंडळावर आहे. ती ग्रुपचे वेगवेगळे रिटेल फॉरमॅट हाताळते. भक्तीला रिलायन्स रिटेलचे एमडी व्ही सुब्रमण्यम यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. भक्तीचे वडील मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सर्वात जवळचे व्यावसायिक सहकारी आहेत. बिझनेस हाऊसमध्ये मनोज मोदींना विशेष स्थान आहे. ते रिलायन्स रिटेल, EIH आणि Jio प्लॅटफॉर्मच्या बोर्डावर आहे. मुकेश अंबानी भक्ती मोदींना मुलीप्रमाणे वागवतात.

मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे जुने मित्र आहेत. मनोज मोदी यांची मुलगी भक्ती हिचे लग्न मुकेश अंबानी यांच्या घरी झाले होते. यावरून दोघांच्या जवळीकीचा अंदाज लावता ( isha ambani Reliance Retail) येतो. २०१६ मध्ये जेव्हा भक्तीचे लग्न झालं तेव्हा मुकेश अंबानी यांनी संपूर्ण सोहळा त्यांच्या घरी आयोजित केला होता. मनोज मोदी आणि मुकेश अंबानी कॉलेजपासून मित्र आहेत. रिलायन्सच्या ऑफिसमध्ये मनोजला एमएम म्हणजेच मास्टर माईंड म्हटले जाते.

भक्ती मोदी
Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात दीपिका पदुकोणने लावली हजेरी! ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

भक्ती मोदी काय काम करते?

ईशा अंबानीने Tira अधिकृतपणे एप्रिल २०२३ मध्ये लॉन्च केला होता. तेव्हापासून भक्ती मोदी सह-संस्थापक म्हणून रिलायन्स रिटेलमध्ये काम करतेय. ती काही काळ रिलायन्स रिटेलमध्ये नवीन व्यवसाय कल्पनांवर काम करत (Who is Bhakti Modi) होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात तिला ५ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले होते. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार भक्तीची भूमिका केवळ टियारापुरती मर्यादित नाही. ती संपूर्ण सौंदर्य आणि फॅशन विभागाच्या कामात गुंतलेली आहे. यात सेफोरा आणि किको, मिलो यांच्याशीही भागीदारी आहे.

Tira सौंदर्य उत्पादनांच्या बाजारपेठेत Nykaa, Tata Cliq Palette, Myntra आणि इतरांशी स्पर्धा करते. ऑनलाइन व्यतिरिक्त, Tira ने मोठ्या शहरांमध्ये ऑफलाइन स्टोअर देखील उघडले आहेत. नायका ६,३८६ कोटींच्या विक्रीसह सर्वात मोठी ब्युटी रिटेलर आहे. त्याच्याकडे ३ हजार ६०० सौंदर्य प्रसाधने आणि ब्रँड आहेत.

भक्ती मोदी
Nita Ambani News : सासू असावी तर अशी...नीता अंबानींकडून सुनबाईला तब्बल ६४० कोटी रूपयांचा व्हिला भेट!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com