Dearness Allowance: कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! एक कोटी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये होणार भरघोस वाढ

Dearness Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात भरपूर वाढ केली आहे. मात्र या महिन्यात महागाई भत्ता देणार नाहीये.
Dearness Allowance: कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! एक कोटी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये होणार भरघोस वाढ
Dearness Allowance
Published On

केंद्र सरकारने तब्बल कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी खूशखबर दिलीय. या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र हा महागाई भत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाहीये. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देऊ शकते. याआधी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना DA/DR वाढीची भेट देऊ शकते असं म्हटलं जात होतं. सध्या डीए/डीआर दर ५० टक्के आहे. त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाल्यास हा दर ५४ टक्क्यांवर पोहोचेल.

Dearness Allowance: कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! एक कोटी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये होणार भरघोस वाढ
State Revenue Sources : राज्यांकडे पैसा येतो तरी कुठून? तिजोरी रिकामी झाली की कर्मचाऱ्यांना पगारही मिळणं होतं मुश्किल

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२ मध्ये २८ सप्टेंबरमध्ये डीएच्या दरात ४ टक्क्यांची वाढ केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर्षी २४ ऑक्टोबरला दिवाळी होती, त्यामुळे सरकारने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात डीए/डीआरचे दर वाढवले ​​होते. मागील वर्षी २४ ऑक्टोबरला दसरा आणि १२ नोव्हेंबरला दिवाळी होती. दिवाळीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ केली जाईल,अशी घोषणा केली होती. दरम्यान यावेळी एक नोव्हेंबरला येणार आहे, तर दसरा १३ ऑक्टोबरला येणार आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डीए वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना १ जानेवारीपासून देय असलेल्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली जाऊ शकते. महागाई भत्त्याचा दर आधी ४६ टक्के होता त्यानंतर त्यात वाढ करत ५० टक्के करण्यात आला होता. आता परत वाढ झाली तर डीएचा दर ५४ टक्के होणार आहे. आता १ जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांना डीएमध्ये चार टक्के वाढ मिळणार आहे. मात्र डीएचा लाभ ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांची थकबाकी म्हणजेच एरियर मिळणार आहे.

DA '54' टक्के झाला तर इतका होईल फायदा

जर पगार १८ हजार असला तर

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८ हजार रुपये असेल, तर ५४ टक्के महागाई भत्त्यानुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे ७२० रुपयांची वाढ होईल. ५० टक्क्यांच्या डीएनुसार, पगारात ९००० रुपयांची वाढ होते, त्याप्रमाणे डीएच्या दरात ४ टक्क्यांची वाढ झाली तर पगारात डीए मिळून ७२० रुपयांची वाढ होणार आहे.

पगार २५ हजार असेल तर

कर्मचाऱ्याचं मूळ वेतन २५ हजार रुपये असेल, तर त्याला दरमहा १००० रुपयांचा लाभ मिळेल. ५० टक्के डीए असेल तर पगारात १२५०० रुपयांची वाढ होते. त्याचप्रमाणे ५४ टक्क्यांच्या वाढीनुसार ही रक्कम १३५००० रुपये होईल. म्हणजेच डीए दर वाढल्यानंतर त्याचा पगार १००० रुपयांनी वाढत असतो.

पगार ३५ हजार रुपये असेल तर

जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ३५ हजार रुपये असेल तर त्याला दरमहा १४०० रुपये अधिक मिळतील. सध्या त्यांना ५० टक्के दराने १७५०० रुपये डीए मिळतात. ४ टक्क्यांनी डीए वाढला तर ती रक्कम १८९०० रुपये होईल. म्हणजेच डीए रेट वाढल्यानंतर त्याचा पगार १४०० रुपयांनी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com