अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीतून गॅस गळती होऊ लागली आहे. संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरला असून या गॅसचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांना डोळे चुरचुरणे, आणि घश्यात खरखर होण्याचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. गॅस गळतीच घटना घडल्यापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर आलीय.
गॅस गळतीमुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झालीय. अख्या शहरात गॅस गळती झाल्याने रेल्वे रुळावरील दृश्यमानता कमी झालीय. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन नॉट रीचेबल येत आहे. यामुळे या धुरांचं काय करावं हे कळत नाही. संपूर्ण शहरात धूर पसरला असताना अधिकाऱ्यांचा फोन लागत नसल्याने भयाण परिस्थिती निर्माण झालीय. या स्थितीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्धभवत आहेत. अनेकांना उलट्या होत आहेत, तर काहींना घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे. दरम्यान ही वायू गळती का झाली याची कारण अद्याप समजू शकलं नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.