AI बिबट्या आणला शहरात, नाशिकमध्ये खोडसाळांची शक्कल

Nashik News : नाशिकमध्ये एआय चा गैरवापर करून बिबट्याचे बनावट फोटो व्हायरल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभागाने तपास केल्यावर फोटो खोटे असल्याचं स्पष्ट झालं असून प्रकरण सायबर पोलिसांकडे देण्यात आलं आहे.
Nashik News
Nashik News
Published On

AI निर्मित फोटोंचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. . नाशिकमध्ये मात्र AI फोटोंमुळे नाशिककरांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागलाय. कारण नाशिकमध्ये AI चा वापर करून चक्क बिबट्या शहरात शिरल्याचे बनावट फोटो तयार करून ते व्हायरल करण्यात आले आणि एकच गोंधळ उडाला. नाशिकमध्ये नेमकं काय झालं? पाहुयात हा स्पेशल

नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर फिरणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं...शहरात बिबट्या शिरल्याचे मेसेज आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर वनविभागानंही तात्काळ बिबट्याचा शोध सुरु केला... वनविभागाचे अधिकारी रात्रभर जंगलात बिबट्याचा शोध घेऊ लागले...जागोजागचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात आले..पण कुठल्याही सीसीटीव्हीत बिबट्या काही दिसेना.... त्यामुळे वनविभागानं बिबट्याचे फोटो पुन्हा तपासले...

Nashik News
Massive fire : हायवेवर मोठी दुर्घटना, २ तासात २०० सिलिंडरचा स्फोट, भयावह घटना कॅमेऱ्यात कैद

आता तुम्ही देखील हा फोटो नीट बघा...नागरिकांनी हा फोटो शेअर करताना या फोटोची सत्यता तपासली नाही.. आणि हा फोटो शेअर केला... मात्र वनविभागानं या फोटोची सत्यता तपासल्यावर हा बिबट्या नेमका कुठुन आला ते कळलं आणि मग वनाधिकारी पोहचले थेट सायबर क्राईम पोलिसांकडे... होय... कारण हा बिबट्या AI निर्मित होता... काही खोडसाळांनी AIचा वापर करून नाशिक शहरात बिबट्या फिरत असल्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायर केला आणि वनविभागाला नाकीनऊ आणलं.

Nashik News
Maharashtra Politics : योगेश कदमांना खिंडीत गाठलं, अनिल परबांनी नेमके काय केले आरोप?

AI निर्मित बिबट्याच्या बनावट फोटोंचं सत्य उघड झालं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून शहरातील वडनेर, जय भवानी रोड आणि अन्य परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळतोय. दोन लहान बालकांचा बिबट्याच्या हल्यात बळी गेलाय. माणसांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. 5 बिबट्यांना पकडण्यात यश देखील आलंय. मात्र अशा खोट्या फोटो आणि मेसेजमुळे आधीच त्रस्त असलेल्या नाशिककरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. एकीकडे AI तंत्रज्ञानात क्रांती घडतेय. तर दुसरीकडे त्याचा गैरवापर अशा प्रकारे समाजात भीती आणि गोंधळ पसरवतोय..त्यामुळे सर्वांनीच सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीबद्दल अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

Nashik News
Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com