Sangram Jagtap News: आता आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल; मराठा आरक्षणावर आमदार संग्राम जगताप यांचा इशारा

Ahmednagar News : आता आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल; मराठा आरक्षणावर आमदार संग्राम जगताप यांचा इशारा
Sangram Jagtap
Sangram JagtapSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. परंतु अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. (Ahmednagar) मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही; तर सरकारमध्ये असून सुद्धा सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा (Sangram Jagtap) आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे. (Live Marathi News)

Sangram Jagtap
Beed News : झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा, गावात भीती

मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे राहिले आहे. सरकार अद्याप निर्णय घेत नाही. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी अहमदनगरच्या कायनेटिक चौक येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा तरुणांनी सहभाग घेतला. (Maratha Aarkshan) एक मराठा 'लाख मराठा आरक्षण' 'आमच्या हक्काचं' अशा घोषणा देत तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला.  

Sangram Jagtap
Anil Parab Statement: जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते; अनिल परब यांचा गौप्यस्फोट

रास्ता रोको आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील सहभाग नोंदवत मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका मांडली. जरी आम्ही सत्तेत असलो तरी मराठा समाजाबाबत आमच्या सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही; तर आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं वक्तव्य यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com