Ahmednagar News: मांजरीला वाचवताना ६ जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

6 People Drown In Biogas Pit In Ahmednagar: बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या सहाही जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Ahmednagar Police) आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
6 People Drown In Biogas Pit In Ahmednagar
6 People Drown In Biogas Pit In AhmednagarSaam Tv

Ahmednagar Crime News:

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडली आहे. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या एकाला वाचवण्यात यश आले आहे. इतर जणांचा वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Ahmednagar Police) आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावामध्ये ही घटना घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी एक जण खड्ड्यामध्ये उतरला. पण मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात तो खड्ड्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर ५ जण देखील या खड्ड्यामध्ये बुडाले. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. त्यामुळे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण खड्ड्यामध्ये बुडाले. सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडले. यापैकी एकाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. इतर ५ जणांचा शोध सुरू आहे.

6 People Drown In Biogas Pit In Ahmednagar
Ajit Pawar: आधी साहेबांना..मग मुलीला मतदान केलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांची पत्नीसाठी बारामतीत फिल्डिंग

या घटनेची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी एकाला बाहेर काढले. या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्याला नेवासा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही व्यक्ती बायोगॅसच्या खड्ड्यात असलेल्या गॅसमुळे चक्कर येऊन बुडाल्याची माहिती आहे. ५ जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडालेल्या व्यक्तींची नावं देखील समोर आली आहेत. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी ५ जणांची नावं आहेत. सध्या घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

6 People Drown In Biogas Pit In Ahmednagar
Ajit Pawar On Vijay Shivtare: विजय शिवतारेंच्या बंडामागे कोणाची फूस, अजित पवारांनी भरसभेत केलं उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com