Ajit Pawar: आधी साहेबांना..मग मुलीला मतदान केलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांची पत्नीसाठी बारामतीत फिल्डिंग

Ajit Pawar On Supriya Sule: बारामतीतील जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी 'आधी साहेबांना मतदान केलं, नंतर मुलीला मतदान केलं, आता सूनेला निवडून द्या.', असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.
Maval Loksabha Election 2024
Ajit Pawar Saam Tv

Ajit Pawar On Sharad Pawar:

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये (Baramati Loksabha Election) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून उभ्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार बारामती आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी 'आधी साहेबांना मतदान केलं, नंतर मुलीला मतदान केलं, आता सूनेला निवडून द्या.', असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.

त्याचसोबत, 'आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहिलात. आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा. म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल.', असं देखील त्यांनी बारामतीकरांना सांगितले.

अजित पवार यांनी बारामतीतील सभेदरम्यान सांगितले की, '१९९१ ला खासदारकीच्या निवडणुकीत मला निवडून दिलं. नंतर वडीलांना म्हणजे साहेबांना निवडून दिलं. नंतर लेकीला निवडून दिलं ३ वेळा. आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटामफाट होईल. म्हणजे वडील पण खूश, लेकपण खूश, कन्यापण खूश आणि सूनही खूश आणि तुम्ही पण खूश.'

Maval Loksabha Election 2024
Chandrashekhar Bawankule: ४ जूननंतर घरात बसून राहण्याचं काम करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी कशी दिली हे सांगितले. ते म्हणाले की, 'ही निवडणूक आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बराच विचार करून उमेदवार कोण द्यायचा त्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांचे नाव समोर आले. त्यांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचे आहे. तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिला आहात. ज्या ठिकाणी पवार नाव असेल त्या ठिकाणी मतदान करा. त्यामुळे पवार नावाला मतदान करण्याची परंपरा खंडित केली असा विचार तुमच्या मनात येणार नाही.'

Maval Loksabha Election 2024
Vasant More On MNS Melava: काही आठवणी कधीच बुडत नाहीत, वसंत मोरेंना येतेय मनसेच्या मेळाव्याची आठवण

'बारामतीत ९० टक्क्यापेक्षा जास्त कामं मी केली आहेत. मात्र काही लोकांनी आपल्या पुस्तकात लिहले आहे की ही कामे मी केली आहेत. आपल्या खासदाराचं प्रकाशित झालेलं पुस्तक नुकतंच मी पाहिलं.', असं ते म्हणाले. त्याचसोबत, 'आज काहीजण म्हणतात मी पक्ष चोरला. पण मी पक्ष चोरला नाही. आज ८० टक्के आमदार माझ्याबरोबर आहेत. आम्ही भूमिका घेतली पटली म्हणून सगळे आमदार माझ्यासोबत आले. कधी कोणाला अडचणीत आणणार नाही.', असे अजित पवार यांनी सांगितले.

Maval Loksabha Election 2024
Lok Sabha Election 2024: 'भाजपमध्ये जाऊन माझ्या मुलाने चूक केली, त्याचा पराभव झालाच पाहिजे,' काँग्रेस नेत्याचे मोठं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com