Ahmednagar News: ठरलेले लग्न मोडले.. ३२ वर्षीय तरुणाने संपवले आयुष्य; व्हिडीओ करत केला धक्कादायक खुलासा

Sangamner Kolhewadi News: आत्महत्येपुर्वी तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड करत आपली व्यथा मांडली असून त्रास देणाऱ्यांची नावेही सांगितली आहेत.
Sangamner Kolhewadi News
Sangamner Kolhewadi NewsSaamtv
Published On

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Sangamner News: जमलेले लग्न मोडल्याने ३२ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली. नितीन सीताराम खुळे असे या तरुणाचे नाव असून गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी लावला आहे. (Ahmednagar Latest News)

Sangamner Kolhewadi News
Beed Political News : 'सगळं दिलं, पण आता रक्ताचं नातं संपलं...', बंडखोर पुतण्यांविरोधात जयदत्त क्षीरसागर आक्रमकपणे मैदानात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कोल्हेवाडीमध्ये (Kolhewadi) ठरलेले लग्न मोडल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. नितीन सीताराम खुळे असे मृत तरुणाचे नाव असून ठरलेले लग्न मोडल्याने त्याने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.

धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपुर्वी तरुणाने व्हिडीओ रेकॉर्ड करत आपली व्यथा मांडली असून त्रास देणाऱ्यांची नावेही सांगितली आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Sangamner Kolhewadi News
Inflation News: ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; तुरडाळीपाठोपाठ आता जिरे-मोहरीचे भावही कडाडले

या प्रकरणात गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी लावला आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीवरून प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर‌ तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com