Inflation News: ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; तुरडाळीपाठोपाठ आता जिरे-मोहरीचे भावही कडाडले

Nashik Inflation Latest News: राज्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाला आहे.
Nashik news inflation outbreak of festive season tur dal cumin-mustard prices have increased
Nashik news inflation outbreak of festive season tur dal cumin-mustard prices have increased Saam TV
Published On

Nashik Inflation Latest News: राज्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाला आहे. तूर, हरभरा, मसूर अशा सर्वच प्रकारच्या डाळींसह मैदा, रवा, साखर, तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, जिरे, मोहरीच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. (Latest Marathi News)

महिनाभरापूर्वी १३४ रुपये असलेली तूर डाळ १५२ रुपये किलोवर गेली असून ती येत्या काही दिवसांत १७० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. हरभरा डाळीची मागणीही पोळ्यासह इतर सणामुळे वाढणार असल्याने सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. तांदळाचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Nashik news inflation outbreak of festive season tur dal cumin-mustard prices have increased
Shivsena Crisis: १६ आमदार अपात्र प्रकरणात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

तांदळाचे भाव आता स्थिर असले तरी येत्या काळात भाव वाढण्याची चिन्हं आहेत. एकीकडे सणासुदीच्या काळात सर्वच पदार्थांची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे फळे आणि भाज्यांचे भाव वाढले आहेत. तर तूर आणि हरभरा डाळीची मागणी जास्त आणि साठा कमी आहे.

लांबलेल्या पावसाचा परिणाम, आगामी काळात उत्पादनात घट होण्याचा अंदाज तसच आवक घटल्याने भाववाढ होत असल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे. शिवाय गव्हाच्या दरात वाढ झाल्याने मैदा, कणिक आणि रव्याचे भाव कडाडले आहेत. साखरेच्या दरातही प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे.

Nashik news inflation outbreak of festive season tur dal cumin-mustard prices have increased
NCP Crisis News: शरद पवार आणि अजितदादा एकच, भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येऊ; रुपाली चाकणकरांचं मोठं विधान

सोबतच मसाल्याचे पदार्थ आणि जिरे मोहरी देखील महाग झालेत. २ महिन्यांत १० ते १५ टक्के वाढ झाल्याने जून-जुलैच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च साधारणतः १५ टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

कोणकोणत्या वस्तूंचे वाढले दर?

किराणा माल जून-जुलै सध्याचे दर

- तूरदाळ - १३० रुपये प्रतिकिलो १५५ रुपये प्रतिकिलो

- हरभरा दाळ - ७० रुपये प्रतिकिलो ८० रुपये प्रतिकिलो

- मूग दाळ - १२० रुपये प्रतिकिलो १३०-१४० रुपये प्रतिकिलो

- उडीद दाळ - ११५ रुपये प्रतिकिलो १३०-१४० रुपये प्रतिकिलो

- मसूर दाळ - १३० रुपये प्रतिकिलो १४० रुपये प्रतिकिलो

- शेंगदाणे - १२० रुपये प्रतिकिलो १४० रुपये प्रतिकिलो

- तांदूळ - ६०-६१ रुपये प्रतिकिलो ६३-६५ रुपये प्रतिकिलो

- साखर - ३८ रुपये प्रतिकिलो ४४ रुपये प्रतिकिलो

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com