सुशील थोरात
अहमदनगर : अहमदनगर शहरातुन गेलेल्या मतदान पुलावरून भरधाव वेगाने जाणारा टेम्पो थेट उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून खाली कोसळला. टेम्पो पुलावरून कोसळल्याने जोरदार आवाज झाल्याने परिसरात घाबरत पसरली होती. दरम्यान या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
अहमदनगर (Ahmednagar) शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या नगर- सोलापूर चौकातच हा अपघात झाला आहे. शहरातून गेलेल्या या उडडाणपुलावर वळण रस्ता आहे. याच ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलाच्या खाली कोसळला. दरम्यान या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident) अपघातानंतर मात्र परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
यापूर्वीही अनेक अपघात
अपघात झाला त्या ठिकाणी याआधीही अनेक वेळा दुचाकी आणि चार चाकी या उड्डाणपूलावरून खाली पडले आहेत. ज्या ठिकाणी वळण आहे. त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चार चाकी खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचे असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.