पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात होणारा मोठा अनर्थ टळला. स्थानकांवरील प्रवाशांमुळे मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद पॅसेंजर गाडीचा अपघात होता होता टळला. नेहमीप्रमाणे ही गाडी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात थांबली. रेल्वेगाडी पुन्हा पुढील स्थानकात जाण्यास सुटली असता अचानक गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेले.
स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाच्या लक्षात येऊन त्याने तत्काळ इंजिन थांबविले. दरम्यान अर्धा ते पाऊण तासांनी इंजिन पुन्हा डब्यांना जोडून वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गाडी वेगात असती तर भीषण अपघात होऊन मोठी हानी झाली असती. परंतु सुदैवाने अनर्थ टळला. (Latest News)
रेल्वे गाडी पुन्हा पुढील स्थानकात जाण्यास सुटली असता अचानक गाडीचे इंजिन डब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेले. स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाच्या लक्षात येऊन त्याने तत्काळ इंजिन थांबविले. दरम्यान अर्धा ते पाऊण तासानी इंजिन पुन्हा डब्यांना जोडून वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गाडी वेगात असताना असा प्रकार घडला असता तर भीषण अपघात होऊन मोठी हनी झाली असती.
पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली
पनवेल वसई रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. कलंबोली ते पनवेल दरम्यान ही घटना घडल्याचं समजतं आहे. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होऊ शकतो. पनवेलहून दिवाकडे जाणाऱ्या अप मार्गावर हा अपघात झाला. तर डाऊन लाईन (दिवा ते पनवेल) सुरक्षित आहे. अपघातात या मालगाडीचे चार डब्बे रुळावरून घसरली. अपघातानंतर अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.