
० माणगावच्या गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस
० गारळ, गोरेगाव, उणेगावला पावसाने चांगलेच झोडपले
० रस्त्यावर नाल्याप्रमाणे पाणी साचले
० जनजीवन विस्कळित
पुण्यात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक
लष्करी गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांची संयुक्त कारवाई
या कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना करण्यात आली अटक
एका मजूर वसाहतीतून या चार बांगलादेशी नागरिकांना करण्यात आली अटक
पळून जात असलेल्या या बांगलादेशींना लष्कर गुप्तचर विभाग आणि पोलिसांनी घेतलं ताब्यात
स्वप्न मोंडल, मिथुन कुमार सांतल, रणधीर मोंडल आणि दिलीप मोंडल अशी अटक केलेल्यांची नावे
या चार ही जणांची आता कसून चौकशी सुरू आहे
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे या दोघांना पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी
पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दाखल गुन्ह्याबद्दल दोघांना पोलीस कोठडी
पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुणे पोलिसांनी दुपारी दोन्ही आरोपींना न्यायालयात केलं होतं हजर
निलेश चव्हाण विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा आहे दाखल
तर शशांक हगवणे यांच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये बनावट कागदपत्र देत शस्त्र परवाना मिळवल्या प्रकरणी गुन्हा आहे दाखल
या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोघांना आज कोर्टात करण्यात आलं होतं हजर
दोघांना पुन्हा न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी
भिवंडी शहरात व ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली
सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली
विजांचा कडकडात पावसाला जोरदार हजेरी
काही भागात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागला
अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली
काही सकल भागात गुडघ्यावर पाणी साचले होते
गुडघ्यावर पाण्यातून नागरिकांनी वाट काढवी लागली
तर अनेक गाड्या देखील या पाण्यामुळे बंद पडल्या .
दीड दोन तासाच्या पावसात कल्याण डोंबिवलीची उडाली दाणादाण
कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या 90 फीट रोडवर साचलं गुडघाभर पाणी
कचोरी येथे साचल गुडघाभर पाणी, वाहन चालकांची तारांबळ
सकाळपासून बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात प्रचंड उकाडा होता,मात्र संध्याकाळच्या सुमारास पावसाने आता हजेरी लावली असून, काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे वातावरणात गारावर निर्माण झाला आहे, दरम्यान कुठेही पाणी भरल्याची घटना समोर आलेली नाहीये
अति मुसळधार पावसाने गुहागरमध्ये दरड कोसळली
जिल्हा परिषद शाळा साखरी आगर नंबर एक च्या शाळेजवळील कोसळली दरड
कोणतीही जीवितहानी नाही, शाळेचे नुकसान नाही.
छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी नागरिकांची उडाली तारांबळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
स्फोट होऊन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आगीत कुठलीच जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती
पैठण एमआयडीसीतील भगवती केमिकल या कंपनीतील घटना
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यात आज शनिवारी रोजी दुपारच्या सुमारास वीजांचे तांडव होऊन वीज कोसळण्याच्या घडलेल्या सहा घटनांमध्ये एक महिलेसह तीन जणांचा मृत्यू तर दोघे जण जखमी आणि दोन घटनांमध्ये चार जनावरे ठार झाली आहेत.
गडमुशिंगी गावात पायात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना सापडला
पोलिसांना बोलावून नागरिकांनी केली सुटका
गांधीनगर पोलिसांनी मात्र घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल न करताच पीडित नागरिकाला सोडले वाऱ्यावर
सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला व्यक्ती झाला गायब
गांधीनगर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
गोवंडीतील अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यानंतर लोकांचा संताप व्यक्त केला. शेकडो लोक रस्त्यावर उतरले. या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील प्रितेश कॉम्प्लेक्स येथे केमिकलच्या गोदामाला भीषण आग
आगीचे कारण अस्पष्ट
अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल
केमिकल साठवण केल्याची माहिती
भाजप आमदार संजय कुटे यांचं जळगाव जामोद येथील निवासस्थानात घुसून निवासस्थान जाळण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . अतिवृष्टीमुळे शेतीच झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकर्यांचा कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण खिंडीच्या उतारावरील धोकादायक वळणावरील पुलावर कंटेनर उलटला. भीषण अपघातामुळे गुजरात मार्गीकेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बौद्ध आणि बहुजन समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्याविषयी बोलताना 'हरीजन'असा वारंवार उल्लेख केला. त्यामुळे बौध्द आणि बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलीय.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी पुण्यात आदित्य चषक 2025 ही कबड्डी स्पर्धा आयोजित केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावलेल्या बॅनरवर महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो झळकल्याचे दिसत आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि बालेवाडी येथे सेनेकडून आयोजित आदित्य चषक मध्ये कबड्डीचे सामने आयोजित केले आहेत. विषय जरी खेळाचा असला तरी सुद्धा आदित्य थरांच्या फ्लेक्सवर अजित पवारांचा फोटो सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय.
मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात काही वेळापूर्वी एका भीषण अपघाताची घटना घडली. एका डंपर चालकाने तीन पादचाऱ्यांना चिरडल्यामुळे तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर घडला.
अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही दिशांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त डंपरचा चालक ताब्यात घेतला असून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अखेर बच्चू कडू यांना उपचारासाठी रुग्णालयात केला दाखल.
बच्चू कडू यांच्यासह 23 आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांनाही रुग्णालयात केलं दाखल.
दहा कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती.
बच्चू कडू यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू.
बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता.
गेल्या सात दिवसात बच्चू कडू यांच्या वजनात सात किलोने घट.
रक्तांच्या नमुन्यांची तपासणी सुरू, लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटोन्स आढळल्याची डॉक्टरांची माहिती
सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाच्या घरातून ४८ तोळे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास
स्पोर्ट्स बाईकमुळे लागला आरोपीचा सुगावा
टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने केली अटक
पुण्यातील हडपसर मध्ये १७ मे रोजी झाली होती घरफोडी
आरोपीकडून ४३ लाख रुपयांचे सोने, हिऱ्याच्या दागिन्यांसह चांदी सुद्धा जप्त
रोहित विलास अंधारे (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे
हा सगळा प्रकार १७ मे रोजी रात्री ९ वाजता पुण्यातील हडपसर भागातील एका इमारतीत घडला
अहिल्यानगर शहरासह अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात.
विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी.
सकाळपासून ढगाळ वातावरण. उकाड्यापासून नागरिकांची सुटका.
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात पाऊस.
धाराशिव च्या उमरगा तालुक्यातील बौध्द आणि बहुजन समाजाच्यावतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भुम-परंडा रस्त्यावर गोळेगाव शिवारात स्कॉर्पिओ वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवर असलेल्या जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, अपघातावेळी स्कॉर्पिओ गाडीत गोहत्यासाठी बेकायदेशीररित्या नेली जात असलेली तब्बल २० वासरे आढळून आली. या वासरांच्या तोंडाला चिकट टेप लावून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. गाडीत असलेल्या २० वासरांपैकी एक वासरू अपघातात जागीच दगावले असून उर्वरित १९ वासरांची सुटका करून त्यांना नजीकच्या गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत अंबाजोगाई येथे प्रहार संघटनेकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आलेय.या आंदोलनासाठी दिव्यांग बांधवांची देखील उपस्थिती होती. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख, केजचे माजी आमदार रोमन साठे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटकपक्षही या आंदोलनात सहभागी झाले होते.
अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. यात प्रवाशांसह अडीचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या विमान दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा चौकशी अहवाल तीन महिन्यांत येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने मुंडन आंदोलन केले. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यामध्ये सहभागी आंदोलकांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्या सरकारकडे मांडल्या.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, या उद्देशाने मुंडन करून हे आंदोलन करण्यात आले.
धाराशिव मध्ये बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले.दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ व्हावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव द्यावा या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
प्रकाश मारुती काळेकर (६७) असे या व्यक्तीचे नाव आहे
पुण्यातील महानगरपालिका जवळ असलेल्या नदी पात्रात आढळून आला मृतदेह
एक मृतदेह नदी पात्रात वाहून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाकडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला
शिवाजीनगर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन साठी ससून रुग्णालयात पाठवला आहे
नेमकी ही हत्या आहे का आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही
प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनासंदर्भात आढावा असतो.
आताचा नवीन व्हेरियंट जास्त गंभीर नाही. लोक अॅडमिट होत आहेत आणि बरे होऊन जात आहेत.
केवळ वयस्कर लोकांना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचे वेगळे वॉर्ड करण्यासाठी सगळ्या रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सुरू केलेलं उपोषण मागे
मागण्या मान्य नाही झाल्या तर, २ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करू
२ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं लागेल, नाही तर सोडणार नाही
बच्चू कडूंचा सरकारला इशारा
यवतमाळच्या पुसद तालुक्यात नुकत्याच आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीच्या शेतींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मंत्री उदय सामंत हे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी सरकार चा निरोप घेऊन दाखल झाले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन केले आहे.
सर्वाधिक २७ रुग्ण हे सध्या मुंबईत आढळून आले आहेत
मुंबई पाठोपाठ पुण्यात २६ रुग्णांची नोंद
पिंपरी चिंचवड, सांगली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मध्ये ५ रुग्ण
ठाण्यात ३ तर नवी मुंबई मध्ये २ रुग्णांची नोंद
राज्यात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.६६ टक्के
- आत्महत्याग्रस्त परिवारातील महिला बच्चू कडूच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी रवाना
- वर्धा सोशल फोरमने बच्चू कडू यांना सांगितली होती एकल महिलांची व्यथा
- बच्चू कडू यांनीही लाऊन धरली आहे मागणी
- कडू यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. वर्धा सोशल फोरमचे अभ्यूदय मेघे यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवारातील एकल महिलांची व्यथा बच्चू कडू यांच्याकडे मांडली.सरकार सक्षम महिलांना लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये मानधन देत आहे तर आत्महत्या ग्रस्त परिवारातील एकल महिलांना सहा हजार रुपये महिना देण्यात यावा ही मागणी करण्यात आलीय
मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक एक तासापासून विस्कळीत
अप मार्गाची वाहतूक विस्कळीत
कल्याण येथून दुसरे इंजन मागवले असून त्या इंजिनच्या साह्याने गाडी पुढे काढण्याचे काम रेल्वेच्या वतीने सुरू
गाडी लेट झाल्याने लोकलसह इतरही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी
कर्जमाफीचा अहवाल केव्हा येणार? कर्जमाफी केव्हा होणार याची तारीख सांगितली नाही
कर्जमाफी बद्दल सरकार बोलायला लागला आहे पण केव्हा करणार हे सांगत नाही
कर्जमाफी केव्हा करणार हा निर्णय झाला नाही
पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त लावला आहे. मात्र कार्यकर्ते कमी पडणार नाही- बच्चू कडू
पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. अजित पवारांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
संशितांच्या गाडीत GPRS तंत्र बसून पोलिसांनी रंगेहाथ पकडले.....
शेती माल चोरून आठवडे बारात करायचे विक्री....
नाशिक शहरासह जिल्ह्यात शेतीमाल व वाहनांची चोरी करणार्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.या संशयितांकडून शेतमाल त्यात सोयाबीन, तांदूळ, गहू व महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप, हिरो कंपनीची एक दुचाकी व दोन मोबाईल फोन जप्त केले.
- द्वारका चौकात वाहतूक अनाधिकृतपणे उभ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
- अनाधिकृतपणे उभी वाहने, फेरीवाल्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई
आज संध्याकाळी चार वाजता उड्डाणपूल खुला होणार त्याच्या आधीच विविध पक्षांकडून उड्डाणपुलाचा श्रेय लाटण्यासाठी केली जात आहे बॅनरबाजी
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनास पाठिबा म्हणून सांगलीच्या इस्लामपूर मध्ये उपोषण सुरू आहे. आज इस्लामपूर बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
- राज्यात आणि देशात अनेक जाणते राजे झाले मात्र त्यांनी कधी विठुरायाकडे येणाऱ्या पालखीसाठी मार्ग बनवला नाही.
- नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी जरी दिल्लीत बसत असले तरी त्यांनी देशाला जोडण्याचे कामं केले आहे.
- आजवर अनेक नेते स्वतःला राज्याचे किंवा देशाचे नेते म्हणत होते मात्र त्यांनी कधी पालखी मार्ग बनवले नाहीत
- पंतप्रधान मोदींनी गरिबी हटावची केवळ घोषणा केली नाही तर त्यासाठी अनेक योजना आणल्या.
महाकाली मंदिराच्या आवारात पहिल्यांदाच साचलं पावसाचे पाणी
काल आडिवरे परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य पाऊस
आडिवरे मंदिराच्या सभामंडपाला सुद्धा लागले पाणी
पहिल्यांदाच मंदिरात पाणी आल्याने अनेक ग्रामस्थ अंचबित.....
गणेश कला क्रीडा येथे कार्यक्रम
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थितीत राहणार....
पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रोला खडसावलं
आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वाहतूक विभागाची एक बैठक पार पडली
पालखी शहरात येण्या अगोदर राडारोडा काढून घ्या मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावल
पुण्यातील वाहतूक अडचणीत काही प्रमाणात मेट्रोचा राडाराडा जबाबदार असल्याचा अजित पवार बैठकीत विधान
बैठकीत मेट्रो अधिकाऱ्यांनी वाहतूक अधिकारी उपस्थितीत
लातूरच्या उदगीर येथील अवलकोंडा गावात मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने, ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत, गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधीची तयारी करण्यात आली आहे . सोपान बिराजदार या व्यक्तीचे निधन झाल्याने गावात अंत्यविधीसाठी जागा नाही.,त्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याच सांगण्यात येत आहे...
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांदाला पावसाचा फटका, कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे आवक झाली कमी..
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सव्वाशे गाड्यांची आवक..
- मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे उन्हाळी कांदा झाला खराब..
- सोलापूर कांदा मार्केट मध्ये कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल..
- सोलापूर कांदा मार्केट मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला 1600 ते 2000 रुपये भाव..
- कमी दर्जाच्या कांद्याला मिळतोय पाचशे ते हजार रुपये दर..
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा..
गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जूनचा मोठा विमान अपघात.. क्षणातच होत्याचं नव्हतं. अनेक प्रवासी मृत्यूच्या दारात गेले.. या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना अकोल्यातल्या रिधोरा गावकऱ्यांनी अन्नत्याग श्रद्धांजली वाहलीये.. रिधोरा ग्रामस्थांकडून एक दिवसीय अन्नत्याग भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात आली आहे..आज रिधोरा गावात कुणाच्याही घरी चूल पेटणार नाहीये.. तसेच आज शेतीच्या कामांनाही ब्रेक लावलाय. अनेक जीव गमवणाऱ्या या विमान अपघाताने संपूर्ण जग हादरलंय.. रीधोरा गावातल्या मुख्य चौकात ग्रामस्थांकडून मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना सामूहिक श्रद्धांजली वाहली आली आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरपडे- भेकुर्ली घनदाट जंगलात स्थिरावलेल्या हत्तींना जिल्ह्याच्या वेशीबाहेर परतवून लावण्यासाठी वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. हत्ती पुनश्च तळकटच्या दिशेने खाली उतरू नये यासाठी त्यांच्या परतीच्या मार्गावर वन विभाग कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्यात आली आहे. परंतु पावसामुळे त्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यात अडथळा येत आहे. तळकट, कोलझर, झोळंबे या गावांमध्ये गेले काही दिवस सहा हत्तींचा वावर होता. त्यांनी इथली बागायतीत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. माड, सुपारी उध्वस्त करीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केलेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.
धनकवडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती
बसमध्ये लाईट बंद होती
बसमध्ये सुमारे 55 ते 60 प्रवासी गुराढोरासारखा प्रवास करत आहेत
या अशा प्रवासासाठी प्रवाशांनी जास्त पैसे मोजायचे का? पीएमपी प्रशासन नक्की कुणासाठी काम करतात?
याचे उत्तर सीएमडी पुणेकरांना देणार आहेत का?
त्यांचा संवाद अशा गर्दीच्या बसमध्ये होणार आहे का ?
असे प्रश्न उपस्थित करुन पीएमपी प्रवास तिकीट दर वाढीचा निर्णय़ मागे घेण्याची मागणी करत आहेत
बैठकीत कोविड, वारी, पुण्यातील पाऊस, पुणे शहरात गेले काही दिवसात झालेली अपघात यासह इतर विषयावर बैठक
पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यासह बैठकीला उपस्थितीत
सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे.यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला आहे.येथील अरळी-दर्शनाळ-मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावच्या सरपंच, उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केलय.
रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने ही घटना घडली.गेल्या अनेक वर्षापासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून आजतागायत याबाबत कोणीही दखल घेतलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
भिमाशंकर भोरगिरी परिसरातील आदिवासी शेतकरी भात रोपे टाकण्याच्या कामात गुंतले असून, शेतात दिवसरात्र मेहनत सुरू आहे.डोंगरमाथ्यावर शेतशिवारात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतीकामांना चांगले बळ मिळत आहे. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून, भातशेतीसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतीकामात मग्न झाले आहेत.
धाराशिव च्या लोहारा तालुक्यातील जेवळीसह परीसरात मेघगर्जनेसह झालेल्या धुवाधार पावसामुळे परीसरातील नदी नाले दुथडी भरुन वाहिल्याने जेवळीसह परिसरातील गावातील साठवण तलाव पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.अनेक वर्षानंतर मृग नक्षत्रातच तलाव ओसांडून वाहत असुन ठिकठिकाणच्या गावातील पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदत झाल्याने नागरीकात समाधान व्यक्त केल जात आहे.
रत्नागिरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा रत्नागिरी नगर परिषदेवरती धडक मोर्चा काढलाय.रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात या आशाखाली मोर्चा काढण्यात आला.यावेळी नगरपरिषदेसमोर मनसे कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते
वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा.
वाढत्या कोरोना रुग्णावर आरोग्य अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक..
बैठकीला विभागीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त पुणे मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित..
सकाळी 8 वाजता विधानभवन येथे अधिकारी बैठक आणि गाठीभेटी
तर 10 वाजता जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम शुभारंभ कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा येथे उपस्थितीत राहणार
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थितीत राहणार
निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग
२०११ च्या जनगणनेनुसार गट-गण.
मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सर्व पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर यांसह ३२ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट-गण रचना तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात गट आणि गणांची रचना करण्यासाठी २०११ जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलाचे सहायक पोलीस आयुक्त (ACP) साईनाथ ठोंबरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेली ९० किमीची कॉम्रेड मॅरेथॉन सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि तेही फक्त ११ तास २१ मिनिटांत
ही मॅरेथॉन जगातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठेच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. साईनाथ ठोंबरे हे पुणे शहरातून अशी कामगिरी करणारे एकमेव पोलीस अधिकारी आहेत.
त्यांच्या या यशामुळे पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर डौलाने फडकला आहे. ठोंबरे यांच्या जिद्द, शारीरिक क्षमतेचे आणि धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही कामगिरी फक्त पोलीस दलासाठी नव्हे, तर संपूर्ण पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता वीज कोसळण्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
काल सायंकाळी सहा वाजून सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला.
विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास पाऊस बरसला. दरम्यान, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरात वीज कोसळण्याची घटना घडली.
वीज कडाडताना मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली.जुने शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) व विभागीय आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरातच वीज कोसळली. याबाबत अग्निशामक दलाच्या लोहियानगर येथील नियंत्रण कक्षात नागरिकांनी खबर दिली. त्यानंतर नायडू अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोचले. त्याचवेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोचले.
वीज कोसळलेल्या ठिकाणी सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळापूर्व कामांची चालढकल उघड.
भारतीय हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
काल उपनगरीय भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर, सायंकाळी उशीरा उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या.
मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, आंबेगाव बु,, नन्हे, बिबवेवाडी, सिंहगडरस्ता, कोथरूड, बावधन,औंध, बोपोडी, पाषाण आणि सूस या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला.
उपनगरय भागात बहुतांशी ठिकाणी मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पाण्याची तळी साचली होती.
क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळापूर्व सफाइची कामे झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले, रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांची तारांबळ उडाली.
तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची 108 फुट उंच मुर्ती तुळजापूर येथील रामदरा तलावात उभारण्यात येणार आहे.
या मुर्तीच्या स्वरुपासह तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी सर्व आमदार व जिल्हा स्तरीय समीतीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी माता भवानी तलवार देतानाची मुर्ती ही द्विभुजा असावी असावी अस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले
तर मंदिर संस्थानने जो आराखडा बनवला आहे त्यामध्ये मुर्ती अष्टभुजा दाखवली आहे.
दरम्यान या सर्व बाबीवर बैठकीत चर्चा होणार आहे
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेची मोठ्या भक्तीभावाने सांगता करण्यात आली. चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चंदन उटी पूजा तब्बल 76 दिवस करण्यात आली. यासाठी 95 कीलो इतका चंदनाचा वापर करण्यात आला.
ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे.
विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा सदस्या ॲड माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. चंदन उटी पूजेच्या माध्यमांतून मंदिर समितीला सुमारे 35 लाख 13 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी ते मुंगळा या रस्त्यावरील मार्गावर मेडशीजवळील एका मोठ्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलेला आहे.
या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असते.
प्रवाशीधारक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी जागेची पाहणी केली खरी, मात्र खड्डा बुजविण्याची कोणतीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही.
काल महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला
बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही ठाम.. आज तोडगा निघणार का याकडे लक्ष?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू व या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं
तर आज बच्चू कडू प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याशी बोलून आंदोलन सोडायचं की पुढे करायचं यावर घेणार निर्णय
तर आज सकाळी 10 वाजता मंत्री उदय सामंत तर दुपारी 2 वाजता मंत्री पंकजा मुंडे देणार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट
अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू करणारा आज सायंकाळी महत्त्वाची घोषणा
शेतकरी कर्जमाफी व बच्चू कडूच्या इतर मागण्या संदर्भात उद्या सत्ता पक्ष वगळता,विरोधी पक्ष,शेतकरी संघटना,सामाजिक संघटना यांनी दिला आहे राज्यभरात रास्ता रोकोचा इशारा
15 ऑगस्ट रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करायचं सध्या तरी नियोजन आहे
मात्र विमान सेवा ऑगस्ट शेवटी रोजी सुरू केली जाईल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 80 ते 85 काम पूर्ण झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं जाणार आहे यादृष्टीने आमचे आणि सरकारचे प्रयत्न आहेत
याबाबत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याशी बातचीत केले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा बाबत
सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी येथे ग्रामपंचातीच्या विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जखमीकडून करण्यात आला आहे.
वडडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये गावाच्या विकास कामावरून प्रश्न उपस्थित केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच ते सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपरिहार्य कारणामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा करण्यात आला रद्द
आज दिवसभर उद्योग मंत्री उदय सामंत हे होते सोलापूर दौऱ्यावर
ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
मात्र न्यायालयाने निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यानंतर थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद व 16 पंचायत समितीच्या पारूप प्रभाग रचनेचे वेळपत्रक राज्य शासनाने जाहीर केले
त्यामुळे लवकरच जिल्ह्यातही नगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे
अहमदाबाद विमान दुर्घटनेत न्हावा गावातील एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या निधनामुळे उरण तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांनी पाटील कुटुंबीयांच्या न्हावा येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दुःखात भरडलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले.
“आमच्या सात गावांपैकी एकुलती एक मुलगी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. तिचा अपघाती मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.
पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी येथे आलो आहे.”
महावितरणच्या तुटलेल्या केबलचा शॉक लागल्याने आकुर्ली येथील रमेश म्हसकर यांच्या तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची घडली.
म्हसकर यांनी आकुर्ली- चिपळे हद्दीत म्हशी चरण्यासाठी नेल्या होत्या. यावेळी महावितरणची केबल तुटलेली असल्याने तिचा शॉक लागून तीन म्हशी मृत्युमुखी पडल्या. म्हशींच्या मृत्यू प्रकरणी महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करायला सुरुवात केली आहे त्यानुसार मॅग्रोजवर बोर्डवॉक करण्यात येणार आहे
एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची निर्मिती होणार आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार करण्यात येत आहे
राज्यात दहा ठिकाणी मॅग्रोजवर बोर्डवॉक
रायगड नवी मुंबई ठाणे बोरिवली पालघर इत्यादी ठिकाणी केले जाणार आहे
साधारणपणे 500 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे
त्यामुळे पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे याबाबत मंत्रालयात आढावा बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडले
वादळी वाऱ्याने शहादा तालुक्याला झोडपलं....
मध्यरात्री जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस.....
महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या जोडणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक एकवर झाडे पडल्याने वाहतुकीस अडचण....
चक्रीवादळामुळे मोठी मोठी झाडे उलमडून पडली....
विजेच्या खांबावर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित....
राज्य मार्ग क्रमांक एकवर कोसळली अनेक झाडे....
नंदुरबार जिल्ह्याला दुर्गम भागाला जोडणारे लहान रस्ते बंद....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.