Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय', राऊतांच्या विखे पाटीलांचा पलटवार

'संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय', राऊतांच्या विखे पाटीलांचा पलटवार
Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut
Radhakrishna Vikhe Patil on Sanjay RautSaam TV

>> सचिन बनसोडे

Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut : 'संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय', असा हल्लाबोल भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. तुम्हीच भाजपचं मंगळसूत्र घातलं होतं आणि घरोबा दुसऱ्यासोबत केला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका वक्तव्यावर त्यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हेच माझ्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विखे पाटील म्हणाले होते. यावर राऊत म्हणाले होते की, ''राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं.''

Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut
Thane Traffic Issue : ठाण्यातील रस्ते होणार 'ट्रॅफिक फ्री', मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले हे आदेश

राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार करत आता विखे पाटील म्हणाले आहवेत की, ''संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं जे लोक म्हणतात, त्याच हे उत्तम उदाहरण आहे.'' (Latest Marathi News)

राऊतांना उद्देशून ते म्हणाले, ''लग्न करून मंगळसूत्र आमचं घालायचं आणि घरोबा दुसऱ्याबरोबर करायचा, हे तुम्ही केलं. आता तिथेही तुमची काय परिस्थिती आहे? तुमच्या वज्रमुठेला आताच तडे गेलेत. उद्या तुम्हाला ते सोडणार नाही याची काळजी घ्या.''

Radhakrishna Vikhe Patil on Sanjay Raut
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

सरकारचं डेथ वॉरंट आलाय, असंही संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या विधानाला उत्तर द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदेंच्या रूपाने कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असून २०२४ ला सरकार आमचंच असेल. या सरकारला प्रधानमंत्री मोदींचं पाठबळ असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com