Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगरमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून नवरा-बायकोने आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं
Ahilyanagar Crime Saam Tv
Published On: 
  • अहिल्यानगरमध्ये नवरा-बायकोची आत्महत्या

  • खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

  • श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे घडली घटना

  • खासगी सावकाराविरोधात कठोर कारवाई करण्याची पिसाळ कुटुंबीयांची मागणी

अहिल्यानगरमध्ये नवरा-बायकोने आत्महत्या केली. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. घरामध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणी सावकाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापुर येथे ही घटना घडली. नवरा-बायकोचा घरामध्ये मृतदेह आढळून आला. सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी रात्री राहत्या घरात साडीने गळफास घेऊन पिसाळ दाम्पत्याने आपले आयुष्य संपवले. खाजगी सावकारांवर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि किर्ती बाळासाहेब पिसाळ या नवरा-बायकोने गळफास घेतला. सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून सावकारांचा तगादा आणि वसुलीसाठी धमकावणं सुरू असल्याने बाळासाहेब पिसाळ अस्वस्थ झालेले होते. काल रात्री या दाम्पत्याने भेर्डापूर येथील राहत्या घरात गळफास लावून आपले जिवन संपवले.

Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं
Ahilyanagar : 'गोल्डन मार्केट'वर FDA ची धाड, समोरील दृश्य पाहून अधिकारी चक्रावले, थेट पाकिस्तान कनेक्शन समोर

बाळासाहेब पिसाळ आणि किर्ती पिसाळ या दोघांना १० वर्षांचा मुलगा आणि ९ वर्षाची मुलगी आहे. खासगी सावकारांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप पिसाळ यांच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित सावकारांवर कारवाई करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे. आई-वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे पिसाळ यांचा मुलगा आणि मुलगी यांची टाहो फोडला.

Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं
Ahilyanagar: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोंधळ, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com