Ahilyanagar : भर उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेत असाल तर सावधान! कुल्फीत भेसळ, डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कुल्फीचे १,८५६ पॅकेट्स जप्त करण्यात आले आहे.
Ahilyanagar : भर उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेत असाल तर सावधान! कुल्फीत भेसळ, डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो
Ahilyanagar NewsSaam Tv
Published On
Summary
  • अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फी जप्त

  • १,८५६ पॅकेट्सवर कारवाई

  • कुल्फीत वनस्पती तेल आढळले

  • अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन

  • प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कारवाई

Ahilyanagar Branded Ice Cream Adulteration Case राज्यातील तापमानाचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे थंडावा मिळावा म्हणून नागरिक थंड पेय, आईस्क्रीमचा स्वाद घेत आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही खात असलेली आईस्क्रीम, कुल्फी सुरक्षित आहे का? ती कशा पासून बनवली जाते? कारण तुम्ही खात असलेली आईस्क्रीम जीवघेणी ठरू शकते. अहिल्यानगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत तब्बल १ हजार ८५६ पॅकेट्स कुल्फी जप्त केली. विशेष म्हणजे हे पॅकेट्स नामांकित कंपनीचं आहे. या आईस्क्रीममध्ये वनस्पती तेल व फॅटचा वापर करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत तब्बल १ हजार ८५६ पॅकेट्स कुल्फी जप्त केली आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. कारण अतिरिक्त वनस्पती तेल वापरल्यामुळे डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. मात्र तपासणी दरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली.

Ahilyanagar : भर उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेत असाल तर सावधान! कुल्फीत भेसळ, डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो
Crime News : मेव्हण्याच्या घरात भावोजीचा दरोडा; खबऱ्याची टीप अन् तिथंच बिंग फुटलं, राष्ट्रीय खेळाडूसह ७ जण सापळ्यात अडकले

दरम्यान जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामंकित कंपनीच्या उत्पादित आणि पुरवठा होणार्‍या कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार शहरातील वितरकांना माल पुरवठा करणार्‍या वाहनाची तपासणी करण्यात आली.

Ahilyanagar : भर उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेत असाल तर सावधान! कुल्फीत भेसळ, डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो
Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ

यावेळी कुल्फीचा साठा आढळून आला आणि तो तात्काळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग सिध्द झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com