Shruti Vilas Kadam
दूध, साखर, वेलची पूड, बदाम-पिस्ते आणि कंडेन्स्ड मिल्क (ऐच्छिक) हे साहित्य तयार ठेवा.
एका पातेल्यात दूध मंद आचेवर उकळत ठेवा आणि ते अर्धे होईपर्यंत आटवा.
दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.
बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ते घालून मिश्रणाला चव आणि टेक्स्चर द्या.
तयार मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यामुळे कुल्फीचा स्वाद अधिक छान येतो.
हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा कपमध्ये भरून 6-8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.
कुल्फी सेट झाल्यावर बाहेर काढून थंडगार सर्व्ह करा आणि घरच्या घरी बनवलेली कुल्फी एन्जॉय करा.