Ahilyanagar Crime : स्विमिंग पुलाच्या चेंजिंग रूममधून आरटीओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरी; चार तासातच पोलिसांकडून पर्दाफाश

Ahilyanagar News : स्विमिंग झाल्यानंतर संकेत मारवाडी हे पुन्हा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी आले. बॅगेत ठेवलेली चैन दिसून आली नाही. शोधाशोध केली असता चैन चोरीला गेल्याची घटना त्यांच्या लक्षात आली
Ahilyanagar Crime
Ahilyanagar CrimeSaam tv
Published On

सुशील थोरात

अहिल्यानगर : सुटीचा दिवस असल्याने सायंकाळच्या सुमारास स्विमिंग पूलमध्ये आरटीओ अधिकारी व त्यांच्या मित्र पोहण्यासाठी गेले होते. या दरम्यान पोहायला गेलेल्या आरटीओ अधिकाऱ्याची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चेंजिंग रूममधून चोरून नेली होती. मात्र या घटनेचा तपास करत तोफखाना पोलिसांनी अवघ्या चार तासात चैन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अहिल्यानगराचे आरटीओ अधिकारी संकेत सुनिल मारवाडी हे त्याच्या मित्रासह रविवारी सायंकाळी शहरातील खाजगी स्विमिंग पूलवर पोहण्यासाठी गेले होते. पोहायला उतरण्यापूर्वी त्यांनी त्यांचे कपडे व गळ्यातील सोन्याची चैन एका बॅगमध्ये भरून चेजिंग रुममध्ये काढून ठेवली होती. हि संधी साधत चोरट्यानी बॅगमध्ये ठेवलेली सोन्याची चैन काढून पसार झाले होते. 

Ahilyanagar Crime
Ratnagiri Water Shortage : रत्नागिरीकरांनो काटकसरीने वापरा पाणी; एप्रिलपासून शहरात होणार पाणी कपात

बॅगेत दिसली नाही चैन 

स्विमिंग झाल्यानंतर संकेत मारवाडी हे पुन्हा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी आले. त्यांनी बॅगेत ठेवलेले कपडे काढल्यानंतर सोबत ठेवलेली चैन दिसून आली नाही. शोधाशोध केली असता चैन चोरीला गेल्याची घटना त्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी स्विमिंग पूलवर धाव घेत संशयित लोकांची विचारपूस केली. 

Ahilyanagar Crime
Sangli Crime : बनावट ग्राहकाची जन्मतारीख ऐकताच भोंदूबाबा म्हणाला..अघोरी पूजा मांडताच झाला भांडाफोड

चार तासात चोरीचा तपास 

पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्या ठिकाणी पोहायला आलेला विवेक विजय वहाडणे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. यामुळे पोलिसांनी त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलीस खाक्या दाखवताच त्याने चैन चोरी केल्याची कबुली दिली. यामुळे आरटीओ अधिकाऱ्याची चोरीला गेलेली चैन मिळून आली. अवघ्या चार तासात तोफखाना पोलिसांनी या चोरीचा तपास लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com